
केंद्र सरकारने आणलेले शेतकरी आणि कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीचे निमित्त साधून काँग्रेसने राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ दिन’ पाळला आणि आंदोलन केले.

हे कायदे आणून शेतकरी आणि कामगारांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा डाव आहे. कृषी कायद्याविरोधातील काँग्रसचे जनआंदोलन हा नव स्वातंत्र्यलढाच असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात केली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज राज्यभरात किसान मजदूर बचाओ दिवस पाळण्यात आला.

राज्याच्या सर्व जिल्हा आणि तालुका मुख्यालयांसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

कृषीविधेयकाचा विरोध म्हणून काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बैलगाडी मोर्चाही काढला होता. यावेळी 'भाजप हटाव, देश बचाव'च्या घोषणा देण्यात आल्या.

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो