
मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘मर्डर मिस्ट्री’ या चित्रपटातील ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यानं मानसीला खास ओळख दिली.

तसेच ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यातील तिच्या आयटम डान्सनं लोकांनी भुरळ पडली होती.

काही दिवसांपूर्वीच मानसी बॉक्सर प्रदीप खरेरासोबत विवाहबंधनात अडकली आहे.

तसेच मानसी आणि प्रदीप ही जोडी नुकतंच ‘वाटेवरी मोगरा’ या गाण्यात झळकली आहे. या गाण्याला मराठी प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय.

मानसी नेहमीच तिच्या लूक्समुळे चर्चेत असते. आता लग्न झाल्यापासून ती सोशल मीडियावर परफेक्ट कपल गोल्स देत आहे.