
ओटीटीवर सध्या 'क्रिमिनल जस्टीस 4' या वेब सीरिजची चांगलीच चर्चा आहे. आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी या सीरिजचा नवीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला. एकूण 8 एपिसोड्स असलेल्या या सीरिजला ओटीटीवर चांगला प्रतिसाद मिळतोय. 3 जुलै रोजी याचा शेवटचा एपिसोड स्ट्रीम झाला होता.

या सीरिजमध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी माधव मिश्राची भूमिका साकारली आहे. तर 'क्रिमिनल जस्टीस 4'मध्ये पंकज त्रिपाठी यांच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारली आहे. अभिनेत्री खुशबू अत्रे यामध्ये रत्नाच्या भूमिकेत आहे.

रत्नाच्या साध्या-भोळ्या स्वभावाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. सीरिजमध्ये अत्यंत साधी दिसणारी खुशबू खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे. आपल्या स्टायलिश लूकने सोशल मीडियावर तिने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

खुशबू मूळची मध्य प्रदेशमधल्या भरवाहा इथली आहे. तिचा जन्म 22 जून 1992 रोजी मुंबईत झाला होता. तिने 'राजी' आणि 'मिशन रानीगंज' या चित्रपटांमध्येही उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत.

खूशबूचं रिअल लाइफ कुटुंब छोटं आहे. त्यात तिचे आई-वडील आणि एक भाऊ आहे. तिला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. तिने रंगभूमीवरही काम केलंय. नाटकांनंतर ती मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजकडे वळली. खुशबूने 2012 मध्ये 'पवित्र रिश्ता' या मालिकेतही छोटी भूमिका साकारली होती.