CSK चा सर्वात मोठा डाव, ज्याने धोनीला वर्ल्ड कप जिंकवला त्यालाच बनवलं हेड कोच, ‘थाला’चं आता काय होणार?

CSK Head Coach: आयपीएल २०२७ मध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने मोठा डाव खेळला आहे, कोच म्हणून धोनीला नाही तर कोणाची निवड केली आहे ते पाहा...

| Updated on: Sep 21, 2026 | 7:49 PM
1 / 5
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने, २०२७ च्या आयपीएल हंगामापासून संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांच्या नियुक्तीची पुष्टी केली आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने, २०२७ च्या आयपीएल हंगामापासून संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांच्या नियुक्तीची पुष्टी केली आहे.

2 / 5

आगामी रणनीती आणि दीर्घकालीन नियोजन लक्षात घेऊन फ्रँचायझीने झहीरवर ही जबाबदारी सोपवली आहे. झहीर आता सीएसके संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून स्टीफन फ्लेमिंग यांची जागा घेतील.

3 / 5

भारताचा सर्वात यशस्वी डावखुरा वेगवान गोलंदाज मानल्या जाणाऱ्या झहीर खानची आंतरराष्ट्रीय कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. त्याने भारतासाठी ९२ कसोटी सामन्यांमध्ये ३११ बळी आणि २०० एकदिवसीय सामन्यांमध्ये २८२ बळी घेतले आहेत. त्याने १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १७ बळीही घेतले आहेत. भारताच्या २०११ च्या विश्वचषक विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि २१ बळींसह तो स्पर्धेतील संयुक्तपणे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता.

4 / 5

आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून झहीर खानची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. आपल्या आयपीएल कारकिर्दीत त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले. त्याने एकूण १०० सामने खेळून ७.५९ च्या इकॉनॉमी रेटने १०२ बळी घेतले. कारकिर्दीच्या अखेरीस त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद भूषवले आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले.

5 / 5

महेंद्र सिंग धोनी पुढील हंगामात चेन्नईचे कोच म्हणून कारभार सांभाळणार असे म्हटले जात होते. खेळाडू म्हणून निवृत्त होऊन तो कोचची जबाबदारी सांभाळेल असे म्हटले जात होते पण आता या सगळ्या अफवा खोट्या ठरल्याच्या पाहायला मिळत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us