

डायटीशियन मोहिनी डोंगरे यांच्यानुसार दह्यामध्ये काळी मिरी टाकून खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं.

दह्यात प्रोबायोटिक्स आणि एंटीऑक्सीडेंट्स असतात. दही आणि काळी मिरीची पोषक तत्व मिळून वजन घटवायला मदत करतात.

दही आणि काळी मिरीसाठी पोटासाठी सुद्धा फायद्याची आहे. वाटीभर दह्यात चुटकीभर काळी मिरी टाकल्यास पचन चांगलं होतं.

दह्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. काळी मिरी टाकून खाल्ल्याने जास्त फायदा होतो. ज्या लोकांना एलर्जी, पोटात जळजळ, अस्थमा आणि हाय बीपीचा त्रास आहे, त्यांनी काळी मिरी खाऊ नये.