वडीलांच्या मृत्यूनंतर शिक्षण सुटले, बनले भारताचे सहावे श्रीमंत उद्योजक

शेअर बाजारातील गुंतवणूकीत धैर्य दाखवत दौलत आणि विश्वास दोन्ही कमावता येतो हे राधाकिशन दमानी यांनी दाखवले,ते केवळ 12 वी उत्तीर्ण आहेत. मीडियापासून दूर रहात. पांढरे शर्ट आणि शांत स्वभावाच्या दमानी यांनी आज डी-मार्ट सारखे भव्य रिटेल स्टोअर उभे करीत जगाला आश्चर्यचकीत केले आहे.

| Updated on: Dec 20, 2025 | 10:28 PM
1 / 5
बिकानेरच्या मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या दमानी यांनी कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या वडीलांच्या निधनानंतर त्यांनी शेअर बाजारात ट्रेंडींग सुरु केले. हा प्रवास सोपा नव्हता.

2 / 5
 1992 च्या शेअर घोटाळ्यात बाजारात उलथापालथ झाली. परंतू दमानी यांनी अजिबात विचलित न होता. त्यातून शिकत राहिले आणि स्वत:ला मजबूत करत राहिले. हाच अनुभव भविष्यात त्यांच्या गुंतवणूकीच्या रणनितीचा आधार झाला. चांगल्या कंपन्यात गुंतवणूक करुन 5 ते 10 वर्षांची वाट पाहून चांगला नफा मिळतो ते त्यांनी दाखवले.

3 / 5
दमानी नेहमीच पांढऱ्या रंगाचे शर्ट परिधान करतात.आणि मीडियाच्या झगमगाटापासून दूर रहातात. प्रत्येक कुंभमेळ्यात स्नान करतात. त्यांचा साधेपणा जीवन आणि गुंतवणूक दोन्हीत दिसतो. कमी भावात चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी करा आणि धैर्य ठेवा तुम्हाला नफा मिळतोच असे ते शिकवतात.

4 / 5
 दमानी यांनी 1999 मध्ये मुंबईतील पहिला रिटेल स्टोर सुरु केला. जो पुढे जाऊन डीमार्ट रुपात देशभरात पसरला. आज 12 राज्यात 440 हून अधिक स्टोर आहेत. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव सामील असून ते देशाचे सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

5 / 5
 दमानी यांनी पीएम केअर फंडात 100 कोटी रुपये दान केले होते.मुंबईत शिवकिशन मुरारका दमानी चॅरिटेबल ट्रस्टच्या द्वारे 56 लायब्ररी तयार केल्या आहेत. जेथे हजारो विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट आणि अभ्यासासाठी सुविधा मिळत आहे.राकेश झुनझुनवाला देखील त्यांना शेअर बाजारातील गुंतवणूकीतला मेंटर मानायचे.