
मार्च महिन्याला आता सुरुवात झाली आहे. या महिन्याचा पहिलाच दिवस काही राशींसाठी चांगला ठरणार आहे. राशीभविष्यानुसार तसे काही योग जुळून आले आहेत. काही राशींना मात्र या महिन्याच्या पहिल्या दिवशी काळजी घ्यावी लागेल. पैशांचे व्यवहारही काळजीपूर्वक करावे लागतील.

मिथून राशीच्या लोकांचा महिन्याच्या पहिल्याच दिवशी आत्मविश्वास वाढेल. ऑफिसमध्ये नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमचे महत्त्वदेखील वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. जीवनात चांगले दिवस यायाला सुरुवात होईल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा योग येईल.

कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात 1 मार्च रोजी मोठा आणि महत्त्वाचा प्रसंग येऊ शकतो. पैसे काळजीपूर्वक खर्च करा. घरात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत काळजी सतर्क राहा. खोकला, सर्दी असे सौम्य आजार होण्याची शक्यता आहे. आर्थिक निर्णय घेताना वडिलांचा सल्ला जरूर घ्या.

कन्या राशीच्या लोकांवर 1 मार्च रोजी कौटुंबिक जबाबदारी येऊ शकते. तुम्ही घेत असलेल्या मेहनतीला फळ मिळेल. खिशात पैसे येतील. परंतु ते खर्चही होतील. जोडीदारासोबत चांगले सुर जुळतील. कुटुंबात शांतता येईल. आरोग्य चांगले राहील. तुमचा मित्र तुम्हाला आर्थिक दृष्टीने दहा देऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. मनातल्या गोष्टी कोणाला सांगू नका.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.