
ज्योतिषशास्त्रांत गृहांच्या स्थानाला फार महत्त्व असते. येत्या 15 ऑगस्टपासून सूर्य, शुक्र आणि बुध ग्रहांची चाल बदलणार आहे. या ग्रहांच्या बदललेल्या दिशांमुळे काही राशींचा चांगलाच फायदा होणार आहे.

येत्या 17 ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तर 21 ऑगस्ट रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल.येत्या 30 ऑगस्ट रोजी बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करेल. याचा मिथून, सिंह आणि वृश्चिक राशींना लाभ होईल.

सूर्य, शुक्र आणि बुध यांनी चाल बदलल्यामुळे मिथून राशीला चांगला फायदा होईल. या राशीच्या लोकांचे धर्माच्या कामात मन लागेल. तसेच प्रकृतीत चांगली सुधारणा होईल. वैयक्तिक आयुष्यात तसेच नोकरीत काही सकारात्मक बदल घडून येतील. अनेक समस्यांवर उपाय निघेल.

सिंह राशीला आगामी काही दिवस चांगले ठरणार आहेत. या काळात व्यापारात नफा मिळाल. नोकरदारांना प्रत्येक कामात चांगले यश येईल. परदेशात जाण्याचा योग येईल. कर्जातून मुक्ती मिळेल. तसेच आर्थिक अडचणी दूर होतील.

वृश्चिक राशीलाही पुढचे काही दिवस चांगले ठरणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल किंवा पगारवाढीचे योग येतील. व्यापारात फायदा होईल. गेल्या कित्येक वर्षांपासून असलेली एखादी समस्या दूर होईल. वेगवेगळ्या मार्गांनी पैसे येतील.
