Gautami Patil : गौतमीच्या गळ्यात कोणाचं नाव, सोन्याच्या साखळीत…लग्नाचे फोटो शेअर करताच त्या व्हिडीओची चर्चा!

सध्या गौतमी पाटीलच्या एका व्हिडीओची खूप चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने गळ्यात एक दागिना परिधान केलेला दिसतोय. या दागिन्यात एक खास नाव आहे. हे नाव नेमके काय आहे, असे विचारले जात आहे.

| Updated on: Mar 23, 2026 | 5:33 PM
1 / 5
नृत्यांगणा गौतमी पाटील हिला आज ओळखीची गरज नाही. तिच्या नृत्यांच्या कार्यक्रमाला आज हजारो तरुणांची गर्दी असते.  विशेष म्हणजे तिला सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिने टाकलेल्या एका व्हिडीओवर हजारो लोक लाईक करतात.

नृत्यांगणा गौतमी पाटील हिला आज ओळखीची गरज नाही. तिच्या नृत्यांच्या कार्यक्रमाला आज हजारो तरुणांची गर्दी असते. विशेष म्हणजे तिला सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिने टाकलेल्या एका व्हिडीओवर हजारो लोक लाईक करतात.

2 / 5

गौतमी पाटील नृत्याच्या किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात खूप सुंदर दागिने परिधान करते. तिच्या मेकअप आणि दागिन्यांचीही तेवढीच चर्चा होते. सध्या गौतमीच्या अशाच एका खास दागिन्याची विशेष चर्चा होत आहे. एका व्हिडीओमध्ये तिने हा दागिना परिधान केला आहे.

3 / 5

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गौतमीने गळ्यात एक सोन्याची चैन परिधान केली आहे. या सोन्याच्या साखळीत एक विशेष नाव आहे. लाल रंगाच्या ड्रेसवर तिने ही सोन्याची साखळी घातली आहे.

4 / 5

या सोन्याच्या साखळीमध्ये एक खास नाव आहे. हा व्हिडीओ पाहून गौतमीच्या गळ्यात कोणाचे नाव आहे, असे विचारले जात आहे. व्हिडीओ लक्ष देऊन पहिल्यावर हे नाव काय आहे ते समजून येत आहे. गौतमीने गळ्यात घातलेल्या सोन्याच्या साखळीत कान्हा असे नाव आहे.

5 / 5

भगवान कृष्णाला कान्हा असे म्हणतात. गौतमीने बिग बॉस विजेता शिव ठाकरेसोबत एक गाणे शूट केले आहे. या गाण्याचेही फोटो खूप व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता तिने दोन दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडीओची चर्चा होतेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us