तिघ्रा गावात दुष्काळाची पाहणी करण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेच नाहीत, गावकरी हिरमुसले…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा आणि अकोला परिसरातील दुष्काळ प्रवण गावांचा बुधवारी दौरा आयोजित केला होता. मात्र, तिघ्रा गावातील शेतकरी त्यांची वाट पाहात असताना तेथे शिंदे यांना पोहचता आले नाही.

| Updated on: Sep 24, 2026 | 12:18 AM
1 / 5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा ठरुनही प्रत्यक्षात शिंदे न आल्याने तिघ्रा येथील शेतकऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.शिंदे यांचा दौरा ठरल्या प्रमाणे न होता ते  अडीच ते तीन तास उशिरा पोहचले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा ठरुनही प्रत्यक्षात शिंदे न आल्याने तिघ्रा येथील शेतकऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.शिंदे यांचा दौरा ठरल्या प्रमाणे न होता ते अडीच ते तीन तास उशिरा पोहचले.

2 / 5

राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते . एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील दुष्काळी भागात जाऊन पाहणी करणार होते आणि शेतकऱ्यांशी संवाद ही साधणार होते .

3 / 5

मात्र, एकनाथ शिंदे ठरलेल्या दौऱ्यात वेळेवर न पोहचता तब्बल अडीच ते तीन तास उशिरा आले.एकनाथ शिंदे यांचा खामगाव तालुक्यातील कोलोरी आणि मोताळा तालुक्यातील चार गावात दुष्काळी पाहणी दौरा होता.

4 / 5

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दौऱ्याला उशीर झाल्याने यांनी खडकी, रोहिणखेड आणि टाकळी येथे दौरा केला तर तिघ्रा गावात त्यांना उशीर झाल्याने पोहचता आले नाही.

5 / 5

परिणामी सकाळपासून शिंदे यांची वाट पाहत असलेले शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आणि त्यांच्यात संताप ही पाहायला मिळाला . तर ज्या गावात शिंदे गेले तेथे शिंदेंनी शेतकऱ्यांच्या सोबत संवादही साधला आणि त्यांना मदतीचे आश्वासन ही दिले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us