
शुक्रवारी रात्री बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला स्पॉट करण्यात आलं. या दरम्यान दीपिका कॅज्युअल लूकमध्ये दिसली.

दीपिकाच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तिनं पिवळा बॉडी कॉन टॉप आणि हाय-वेस्ट फ्लेअर जीन्स कॅरी केलेलं होतं. सोबतच तिनं पांढर्या रंगाचे स्नीकर्स आणि गोल्डन हूप इयररिंग परिधान केले होते. तिचा हा कॅज्युअल लूक चाहत्यांना चांगलाच आवडला. आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दीपिका सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असते. ती बर्याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. तिनं काही दिवसांपूर्वी पती रणवीर सिंगसोबत डान्सचा व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता आणि चाहत्यांनी त्या व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव केला होता.

दीपिकाप्रमाणेच तिची बहीण अनिशा पादुकोणसुद्धा कॅज्युअल लूकमध्ये दिसली. यावेळी तिनं काळा शर्ट आणि जीन्स परिधान केला होता.

यावेळी दीपिकानं Louis Vuitton ची बॅग कॅरी केली होती. या बॅगची किंमत 2,58,047 रुपये आहे. अभिनेत्रीच्या स्टाईलविषयी बोलायचं झालं तर तिनं एक Louis Vuitton चा मास्क लावला होता.