Multibagger stock: गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा; 370 टक्क्यांची तुफान तेजी, हा शेअर कोणता?
डिफेन्स कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला. या कंपनीच्या शेअरमध्ये 370 टक्क्यांची उसळी आली. बाजारातील चढउतारातही एकाच वर्षात या शेअरने दमदार परतावा दिला. कोणता आहे हा शेअर?

एयरोस्पेस अँड डिफेन्स इंडस्ट्रीसंबंधित स्मॉलकॅप कंपनी एमटीएआर टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये तुफान तेजी आली. एमटीएआर टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सने गेल्या काही दिवसांपासून शेअरधारकांना छप्परफाड परतावा दिला आहे

डिफेन्स कंपनी एमटीएआर टेक्नॉलॉजीजचा शेअर गुरुवारी BSE वर 14 टक्क्यांहून अधिकने उसळला. हा शेअर गुरुवारी 6450.80 रुपयांवर बंद झाला. हा शेअर 6750 रुपयांवर पोहचला. 52 आठवड्यातील उच्चांकावर हा शेअर पोहचला.

52 आठवड्यातील निच्चांकावरून हा शेअर 370 टक्क्यांनी उसळला. एमटीएआर कंपनीचा शेअर 7 मे 2025 रोजी 1350.25 रुपयांवर होता. गुरुवारी 30 एप्रिल 2026 रोजी हा शेअर 6450.80 रुपयांवर पोहचला. या कंपनीचे मार्केट कॅप गुरुवारी 19,840 कोटींवर पोहचले.

गेल्या पाच दिवसात एमटीएआर टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये 19 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. एका महिन्यात हा शेअर 79 टक्क्यांनी उसळला. तर एका महिन्यात त्याने मोठी झेप घेतली. हा शेअर 3602.90 रुपयाहून 6450.80 रुपयांवर पोहचला.

गेल्या 5 वर्षांतील आकडेवारी पाहता, या शेअरमध्ये 591 टक्क्यांची उसळी दिसली. 30 एप्रिल 2021 रोजी हा शेअर 933.70 रुपयांवर होता. तर 30 एप्रिल 2026 रोजी हा शेअर 6450.80 रुपयांवर बंद झाला. गेल्या चार वर्षांत या शेअर्समध्ये 284 टक्क्यांची तेजी दिसली.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.