Deool Band 2 : 10 कोटीत बनलेला मराठी चित्रपट सुपरहिट, ‘सैराट’नंतर मोठी कामगिरी; कमाईचे आकडे पाहून बसेल धक्का

Deool Band 2 Closing Collection : प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' या भक्तिप्रधान मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले आहे. तूफान कमाई करत हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वाधिक यशस्वी मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या चित्रपटाने महाराष्ट्रातील 'राजा शिवाजी' चित्रपटाचा विक्रम मागे टाकत, बजेटच्या तुलनेत तब्बल 750 % नफा कमावला. दमदार कथा आणि दर्जेदार सादरीकरणामुळे प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, हेच या यशाचे गमक आहे.

| Updated on: Jul 08, 2026 | 11:22 AM
1 / 6
प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' या भक्तिप्रधान मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवत आपला थिएटरमधील प्रवास पूर्ण केला आहे. उत्कृष्ट कमाईच्या जोरावर या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. सुमारे 10 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला.  21 मे रोजी प्रदर्शित झालेला 'देऊळ बंद 2' हा 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. दमदार कथा, प्रभावी अभिनय आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळा ठसा उमटवला आहे. अंतिम टप्प्यात या चित्रपटाने अखेर किती कमाई केली आणि कोणते विक्रम आपल्या नावावर केले, ते जाणून घेऊया.

2 / 6
मोहन जोशी, स्नेहल तरडे, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर यांच्यासह अनेक दमदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या 'देऊळ बंद 2' ने भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पिंकविलाच्या अहवालानुसार, या कमाईमुळे हा चित्रपट आतापर्यंतचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे.

3 / 6
या चित्रपटाने महाराष्ट्रातील 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या लाइफटाइम कमाईचा विक्रम मागे टाकला. मात्र 'बाईपण भारी देवा' आणि 'सैराट' या चित्रपटांच्या जवळपास 90 कोटी रुपयांच्या कमाईपर्यंत तो पोहोचू शकला नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील एकूण कमाईच्या क्रमवारीत 'देऊळ बंद 2' चौथ्या स्थानावर असून, 'राजा शिवाजी' 110 कोटी रुपयांच्या कमाईसह अव्वल स्थानी आहे. विशेष म्हणजे, या आकडेवारीत चित्रपटाच्या हिंदी डब आवृत्तीच्या कमाईचाही समावेश आहे.

4 / 6
चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाईच केली नाही, तर यंदाच्या वर्षातील मराठी चित्रपटसृष्टीसाठी सर्वाधिक नफा कमावणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण केली.  दमदार कथा आणि दर्जेदार सादरीकरण असेल तर प्रेक्षकांचा प्रतिसाद निश्चित मिळतो हे यातून स्पष्ट झालंय.

5 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार,  'देऊळ बंद 2' सुमारे 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने अंतिम टप्प्यात 85 कोटी रुपयांची कमाई केली. म्हणजेच निर्मात्यांना 75 कोटी रुपयांचा निव्वळ परतावा (ROI) मिळाला. टक्केवारीत पाहिल्यास हा 750 टक्के रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ठरतो. त्यामुळे हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.

6 / 6
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले असून, कैलाश वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि ज्युली वाणी-सूर्यवंशी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटात महेश मांजरेकर, प्रवीण तरडे, प्रसाद ओक, ओम भूतकर, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड, जगन्नाथ निवांगुणे आणि अतुल कुडाळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Follow Us