‘देऊळ बंद’मधील राघव शास्त्रीची लेक सना आता झाली इतकी मोठी; ओळखणंही कठीण

प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद' या चित्रपटातील चिमुकली सना तुम्हाला आठवतेय का? राघव शास्त्री आणि सना ही बापलेकाची जोडी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली होती. तीच सना आता खूप मोठी झाली आहे. आर्या घारे असं या अभिनेत्रीचं नाव आहे.

| Updated on: May 27, 2026 | 1:47 PM
1 / 5
प्रवीण तरडे यांचा 'देऊळ बंद 2' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. मात्र अकरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'देऊळ बंद' हा पहिला भाग अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. यामध्ये अभिनेता गश्मीर महाजनीने राघव शास्त्रीची भूमिका  साकारली होती. तर बालकलाकार आर्या घारे त्याच्या ऑनस्क्रीन मुलीची म्हणजेच सनाची भूमिका साकारली होती.

प्रवीण तरडे यांचा 'देऊळ बंद 2' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. मात्र अकरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'देऊळ बंद' हा पहिला भाग अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. यामध्ये अभिनेता गश्मीर महाजनीने राघव शास्त्रीची भूमिका साकारली होती. तर बालकलाकार आर्या घारे त्याच्या ऑनस्क्रीन मुलीची म्हणजेच सनाची भूमिका साकारली होती.

2 / 5

या अकरा वर्षांत आर्या घारे बरीच मोठी झाली असून आता तिला ओळखणंही कठीण झालं आहे. आर्या सोशल मीडियावर सक्रिय असून इन्स्टाग्रामवर ती तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. 'देऊळ बंद'नंतर आर्याने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केलंय. इन्स्टाग्रामवर तिचे सुंदर फोटो पहायला मिळतात.

3 / 5

आर्याने 'बंदी शाळा' या चित्रपटात आणि 'गाथा नवनाथांची' या मालिकेत भूमिका साकारल्या आहेत. 'देऊळ बंद' या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना ती तिच्या अभिनयाचे गुरू मानते. 'मी या भागात नाही, पण माझं मन, माझ्या भावना आजही या कथेशी तितक्याच जोडलेल्या आहेत. काही सुरुवाती आयुष्यात फक्त सुरुवात राहत नाहीत.. त्या आपल्या अस्तित्त्वाचा एक भाग बनून जातात', अशी पोस्ट तिने 'देऊळ बंद 2' प्रदर्शित होताना लिहिली होती.

4 / 5

आजही प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद' हा चित्रपट प्रेक्षकांकडून तितक्याच आवडीने पाहिला जातो. हा चित्रपट प्रवीण तरडेंच्या कारकिर्दीसाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरला. आता 'देऊळ बंद 3' हा तिसरा भागसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. यामध्ये गश्मीर पुन्हा एकदा राघव शास्त्रीच्या भूमिकत दिसणार आहे. मात्र या तिसऱ्या भागात आर्या झळकणार की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

5 / 5

'देऊळ बंद हा माझा फक्त पहिला चित्रपट नव्हता तर ते माझं पहिलं स्वप्न होतं, पहिली ओळख होती आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आयुष्यभरासाठी माझ्या मनात घर करून राहिलेला एक खूपच खास प्रवास,' अशा शब्दांत आर्याने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us