देवेंद्र फडवणीस ते आदित्य ठाकरे; मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला

मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या दहीहंडींना विविध राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. नेत्यांनी भेटून गोविंदांशी संवाद साधला.

| Updated on: Sep 05, 2026 | 7:33 PM
1 / 5
मुंबईसह ठाण्यातील दहीहंडींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून आदित्य ठाकरेंपर्यंत हजेरी लावली. दहीहंडींना हजेरी लावून गोविंदा पथकांचं प्रोत्साहन वाढवण्याचे कार्य राजकीय नेत्यांनी केलं.

मुंबईसह ठाण्यातील दहीहंडींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून आदित्य ठाकरेंपर्यंत हजेरी लावली. दहीहंडींना हजेरी लावून गोविंदा पथकांचं प्रोत्साहन वाढवण्याचे कार्य राजकीय नेत्यांनी केलं.

2 / 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपरमध्ये आमदार राम कदम यांनी आयोजित केलेल्या ‘दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. यावेळी त्यांनी हजारो गोविंदांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले.

3 / 5

एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभीनाका मित्र मंडळाच्या वतीने आयोजित 'दहीहंडी उत्सवात उपस्थिती दर्शवली. टेंभीनाक्याची दहीहंडी केवळ एक स्पर्धा आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जपलेल्या परंपरेची आणि ठाण्याच्या सांस्कृतिक ओळखीची मानाची खूण आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

4 / 5

आदित्य ठाकरे यांनी करीरोडमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समितीच्या दहीहंडीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी गोविदांचं प्रोत्साहन केलं.

5 / 5

अविनाश जाधव यांच्या ठाण्याच्या नौपाडामधी दहीहंडीची जोरदार चर्चा होत आहे. या माझ्या हंडीच्या व्यासपीठावर गोविंदाचा कोणतीही साडी घालून बाई नाही, असं म्हणत अविनाश जाधव यांनी विरोधकांना टोला लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us