AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Praniti Shinde : खासदार प्रणिती शिंदेंविरोधात नको ती टिप्पणी डॉक्टरला चांगलीच महाग पडली

Praniti Shinde : सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात टिप्पणी करणं एका डॉक्टरला चांगलचं महाग पडलं आहे. प्रणिती शिंदे सातत्याने विविध मुद्यांवर आवाज उठवत असतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या त्या कन्या आहेत.

Praniti Shinde : खासदार प्रणिती शिंदेंविरोधात नको ती टिप्पणी डॉक्टरला चांगलीच महाग पडली
Praniti Shinde
| Updated on: Oct 23, 2026 | 12:20 PM
Share

सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात सोशल मिडियावर अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी सांगलीच्या ईश्वरपूर पोलीस ठाण्यामध्ये एका डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासेगावचे डॉक्टर संजय शेळके यांच्या विरोधात काँग्रेस प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट मनीषा रोटे यांनी त्याप्रमाणे फिर्याद दाखल केली होती. 15 ऑक्टोबर रोजी खासदार प्राणिती शिंदे यांनी फेसबुकवर भाजप विरोधात पोस्ट केली होती. यावर सचिन शेळके याने महिलांच्या विनयभंग करणारे ,आपत्ती जनक व अश्लील कमेंट केली होती. याप्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टर सचिन शेळके यांच्या विरोधात काँग्रेस नेत्या ऍडव्हकेट मनीषा रोटे यांनी केलेला तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी या प्रकरणी केलेल्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

प्राप्त प्रथम माहिती अहवालानुसार, खासदार प्रणितीताई शिंदे यांनी 15 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 9.04 वाजता फेसबुकवर राजकीय विषयासंदर्भातील पोस्ट प्रसिद्ध केली होती. या पोस्टवर 16 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 11 वाजता डॉ. सचिनकुमार शेळके यांनी महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणारी अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिला काँग्रेसच्या इस्लामपूर येथील कार्यकर्त्या अॅड. मनीषा चंद्रकांत रोटे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. संबंधित टिप्पणीमुळे महिलेच्या विनयशीलतेचा अपमान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, या टिप्पणीचे स्क्रीनशॉटही पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

महिलांची प्रतिष्ठा आणि सन्मान जपण्यासाठी आम्ही ठामपणे आवाज उठवू

या तक्रारीची दखल घेत इस्लामपूर पोलिसांनी 22 ऑक्टोबर 2026 रोजी गुन्हा क्रमांक 0413/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 79 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सोशल मीडियावर राजकीय मतभेद व्यक्त करताना महिलांविषयी अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरण्याच्या प्रकारांबाबत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. “महिलांचा अपमान करणाऱ्या अशा प्रकारांकडे महिला काँग्रेस दुर्लक्ष करणार नाही. महिलांची प्रतिष्ठा आणि सन्मान जपण्यासाठी आम्ही ठामपणे आवाज उठवू. सोशल मीडियावर महिलांविरोधात अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई व्हावी, यासाठी महिला काँग्रेसचा पाठपुरावा सुरूच राहील,” असा इशारा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी दिला.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?