Devendra Fadnavis Lavish Bungalow Tour: ‘लकी चेयर्स’पासून ते गोंडस वासरापर्यंत; पाहा मुख्यमंत्री फडणवीसांच्या सरकारी बंगल्याची खास झलक

Devendra Fadnavis Lavish Bungalow Tour: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायम त्यांच्या मोठ्या निर्णयांमुळे चर्चेत असतात. पण आता फडणवीस कुटुंब त्यांच्या आलिशान बंगल्यामुळे चर्चेत आलं आहे. त्यांच्या घरातील लकी चेयर्सची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे... तर पाहा फडणवीसांच्या सरकारी बंगल्याची खास झलक!

| Updated on: Nov 13, 2026 | 11:27 AM
1 / 13
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सरकारी बंगला 'वर्षा' त्याच्या सुंदर इंटेरियर आणि शाही अंदाजामुळे चर्चेत आहे. आता या आलिशान बंगल्याची अमृता फडणवीस यांनी  खास झलक दाखवली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सरकारी बंगला 'वर्षा' त्याच्या सुंदर इंटेरियर आणि शाही अंदाजामुळे चर्चेत आहे. आता या आलिशान बंगल्याची अमृता फडणवीस यांनी खास झलक दाखवली आहे.

2 / 13

एका मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी बंगल्यातील काही भागांची खास झलक दाखवली आहे. या घरात साधेपणा आणि आधुनिक डिझाइन यांचा मेळ घालून एक उत्कृष्ट लूक निर्माण केला आहे.

3 / 13

मुंबई शहरातील पॉश परिसर मलबार हिल येथे हा बंगला स्थित आहे. जवळपास 12000 क्षेत्रफळात पसरलेल्या या बंगल्यात यापूर्वी महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री राहिले आहेत. सध्या या बंगल्यात फडणवीस कुटुंब राहत आहे.

4 / 13

अमृता यांनी सरकारी बंगल्यात राहण्याच्या अनुभवाबद्दल सांगितलं. 2014 ते 2019 या काळातही ते येथे राहत होते. एप्रिल 20 25 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कुटुंबासह पुन्हा येथे राहायला आले.

5 / 13

पुन्हा 'वर्षा' बंगल्यात राहायला आल्यानंतर त्यांनी फार कोणते बदल केले नाहीत. अमृता फडणवीस त्यांच्यासोबत फक्त एक खास वस्तू त्यांच्यासोबत घेऊन आल्या आहेत. लाल रंगाच्या लकी चेयर्स सध्या वर्षा बंगल्यात आहेत.

6 / 13

अमृता फडणवीस यांनी सांगितल्यानुसार, सीएम होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस याच चेयर्सवर बसून महत्त्वाचे निर्यण घ्यायचे. याच कारणामुळे त्या खुर्च्या आजही फडणवीस कुटुंबियांसोबत आहेत...

7 / 13

हे घर प्राचीन वस्तूंनी सजवलेले आहे, ज्यामध्ये पितळी हत्ती आणि भगवान गणेशाच्या मूर्तींचा समावेश आहे. या बंगल्यात एक मोठी गॅलरी आहे, तसेच एक ante-chamber देखील आहे, जिथे मुख्यमंत्री छोट्या बैठका घेतात.

8 / 13

या खोलीत चाहत्यांनी दिलेल्या फोटो फ्रेम्स आणि इतर भेटवस्तू मांडून ठेवल्या आहेत. अमृता यांनी त्यांच्या स्वयंपाकघराला पांढरा लूक दिला आहे. बंगल्यातील बाग एखाद्या हॉटेलच्या बागेपेक्षा कमी प्रभावी नाहीत.

9 / 13

'वर्षा' बंगल्याच्या गार्डनमध्ये वेगवेगळी झाडी आहेत. चारही बाजूला फक्त हिरवळ आहे... मोठे नारळाचे झाडं आहेत. अमृता फडणवीस यांना गार्डनमध्ये वेळ व्यतीत करायला प्रचंड आवडतं...

10 / 13

अमृता फडणवीस यांचं प्राण्यांवर देखील प्रचंड प्रेम आहे... त्या रोज पक्ष्यांना दाणे टाकतात. त्यांच्या बंगल्यात पाळीव प्राणी देखील राहतात...

11 / 13

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' बंगल्यात एक पोपट देखील आहे, ज्याचं नाव चिकन असं आहे, तर एक गोंडस वासरु देखील आहे, ज्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे...

12 / 13

'वर्षा'मध्ये सजावट किंवा महागड्या शोभेच्या वस्तूंचा अतिरेक नाही. अमृता यांनी हे घर अत्यंत सुसंस्कृत आणि मोहक शैलीत सजवलं आहे, जिथे प्रत्येक कोपऱ्यात त्यांच्या अनेक आठवण दडलेल्या आहेत.

13 / 13

अमृता यांचं नागपूरशी एक विशेष नातं आहे; त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे तिथे घालवली आहेत. त्या म्हणतात, "माझे हृदय नागपूरमध्ये वसलेलं आहे, तर माझ्या हृदयाचे ठोके आता मुंबईत उमटतात..."

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us