
अवघ्या टिव्ही सिरियलच्या चाहत्यांची लाडकी गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

देवोलीना भट्टाचार्जी हिने साकारलेली गोपी बहू अनेकांना भावली. तितकंच तिचा क्लासी लुकही तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरतो.

देवोलीनाचा जन्म 22 ऑगस्ट 1985 रोजी आसाममध्ये झाला. भट्टाचार्जी कुटुंब मूळचं बंगाली आहे. तिचं लहानपण दिल्लीतील गुरुग्राममध्ये गेलं. तिचं शिक्षण आसामच्या शिवसागरमधल्या गोधुला ब्राउन मेमोरियल इंग्लिश हायस्कूलमधून झालं.

देवोलीनाने डान्स इंडिया डान्स 2 मध्ये सहभाग घेतला. सावरें सबके सपने प्रीतों या कार्यक्रमात दिसली. नंतर तिने केली साथ निभाना साथिया ही लोकप्रिय मालिका ज्यातून तिला प्रसिद्धी मिळाली. लाल इश्क मालिकेतील मनोरमा ही भूमिका प्रचंड गाजली.

बिगबॉसच्या 13 व्या सिझनमध्येही ती दिसली. पुन्हा साथ निभाना साथिया 2 ही मालिका आली. त्यात तिने पुन्हा एकदा गोपीची भूमिका साकारली. बिग बॉसच्या 14 व्या सिझनमध्येही ती दिसली. लेडिज V/s जंटलमेन या शोमध्येही ती दिसली. नुकत्याच झालेल्या बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्येही ती दिसली.