
लालबाग राजाच्या दर्शनाला लाखोची गर्दी पाहायला मिळत आहे. देशभरातून आणि राज्यभरातून येणारे भक्त राजाच्या दानपेटी सोन्याचांदीच्या दान करत असतात. यंदा पहिल्या दिवशी दोन लाखाचा सोन्याचा मोदक एका भक्ताने दान केला आहे.

एक किलो चांदीची वीट, मोदक, गणपती , मुकुट, हार, पाळणा, समई, फुल घर चांदीचे देण्यात आलंय. सोन्याच्या वस्तू सोन्याची पाऊल, हार, मुकुट, अंगठी, सोन्याचे नाणे, सोन्याची गणपतीची मूर्ती आणि दोन लाखाचा सोन्याचा मोदक भक्तांनी दिलाय.

गणेशोत्सवात भाविकांची सर्वाधिक गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनाला होत असते. यावेळी भाविक लालबागाच्या राजाला मोठ्या प्रमाणात दान अर्पण करत आहेत. गणेशोत्सवाची सुरवात झाल्यावर दुसऱ्या दिवासापासून या दान केलेल्या वस्तू आणि निधींची मोजदाद सुरू करण्यात येते.

ही मोजदाद बॅंक ॲाफ महाराष्ट्र बॅंक आणि जी एस महानगर बॅंकेचे कर्मचारी करत असतात. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या निधीचा उपयोग गरजू सर्वासामान्य नागरिकांच्या कल्याणकारी उपक्रमासाठी करत असते.

लालबागाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे खजिनदार मंगेश दळवी आणि त्यांचे कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत सध्या ही मोजदाद सुरू केली आहे एका परदेशी भक्तांनी डॉलरचा हार दानपेटीत टाकला आहे.