धनश्री वर्माचे 5 धक्कादायक खुलासे; फेक लग्न, भीती, रडणं.. युजवेंद्र चहलबद्दल काय सांगितलं?

धनश्री वर्माने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले आहेत. युजवेंद्र चहलसोबत घटस्फोटाच्या शेवटच्या सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं, याविषयीही तिने सांगितलं आहे.

| Updated on: Aug 21, 2025 | 11:17 AM
1 / 6
कोरिओग्राफर आणि डान्सर धनश्री वर्माने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूर्व पती आणि भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू युजवेंद्र चहलबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी तिने तिच्यावरील आरोपांबाबतही स्पष्टीकरण दिलं.

2 / 6
धनश्री म्हणाली, "कोर्टाच्या निकालानंतर मी मागच्या गेटने बाहेर पडले. कारण मला मीडियाला सामोरं जायचं नव्हतं. नंतर गाडीमध्ये बसल्यावर मी त्याचा (चहल) फोटो पाहिला आणि मला धक्काच बसला. मला वाईट वाटलं. मी विचार करत होती की मी याच्यासाठी रडत होती का? त्या घटनेनं मला आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा दिली. त्या टी-शर्टद्वारे मला मेसेजच द्यायचा होता तर भावा व्हॉट्सअॅप करायचं ना?"

3 / 6
युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटानंतर धनश्रीने त्याच्याशी फेक लग्न केल्याचीही चर्चा होती. त्यावर ती म्हणाली, "आपण याला खासगी आयुष्य म्हणतो आणि त्यामागेही कारण असतं. आपलं खासगी आयुष्य हे खासगीच असावं. टाळी एका हाताने वाजत नाही. मी बोलत नाही, याचा अर्थ असा नाही की कोणी दुसऱ्याने फायदा उचलावा. हे योग्य नाही."

4 / 6
घटस्फोटाच्या शेवटच्या सुनावणीदरम्यान अत्यंत भावूक झाल्याचा खुलासा धनश्रीने या मुलाखतीत केला. "माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी तो अत्यंत भावूक क्षण होता. मी जेव्हा कोर्टात होती आणि त्यांनी निकाल ऐकवला, तेव्हा मी ढसाढसा रडत होती. मी सर्वांसमोर मोठमोठ्याने ओरडत रडत होती. त्यावेळी माझ्या काय भावना होत्या, हे मी शब्दांत मांडू शकत नाही."

5 / 6
यावेळी धनश्रीला तिच्या भीतीबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिलं, "भीती या गोष्टीची वाटते की माहीत नाही, कधी कोणी उठून पॉडकास्टवर येईल आणि काय बोलेल? मला आता भूतांपासून भीती वाटत नाही."

6 / 6
धनश्री तिच्या बालपणीच्या स्वप्नाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाली. तिला डॉक्टर व्हायचं होतं. तिने डेंटिस्ट म्हणून करिअरची सुरुवातसुद्धा केली होती. परंतु नंतर डान्सर म्हणून तिने आपला प्रवास सुरू केला.