
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलच लग्न यावर्षी 2025 मध्ये मोडलं. लग्न मोडल्यानंतर धनश्रीचा सर्व फोकस आपल्या कामावर आहे. ती म्युझिक व्हिडिओ आणि आयटम सॉन्गमध्ये दिसते.

ह्यमंस ऑफ बॉम्बेसोबत बोलताना धनश्रीला विचारलं की, ती पुन्हा प्रेमाच्या शोधात आहेस का? त्यावर ती व्यक्त झाली. मला असं वाटतं की, आपल्या सर्वांना आयुष्यात प्रेम हवं आहे. कोणाला प्रेम नकोय? आपल्या सगळ्यांना गरज आहे.

कुठे ना कुठे आपल्याला अपेक्षा असते, प्रेमावर विश्वास असतो. कधी-कधी प्रेम अशी गोष्ट असते जी तुम्हाला रेगुलेट करते. स्वत:वर प्रेम असलच पाहिजे. कारण स्वत:वर प्रेम करणं सर्वात जास्त गरजेच आहे. आधी स्वत:वर प्रेम करा, मग प्रेम शोधा. मी या सगळ्या गोष्टी समजते असं धनश्री म्हणाली.

जर आयुष्याने माझ्यासाठी काही चांगलं लिहून ठेवलं असेल, तर का नको?. आई-वडिल, मित्र परिवाराला सुद्धा ती गोष्ट हवीय असं धनश्री म्हणाली. माझी स्वत:ची इच्छा आहे की, चांगला होवो. कोणाला प्रेम नकोय?. आपण सगळे प्रेमाचे भुकेलो आहोत. आज प्रेमाची कमी आहे, सुंदर गोष्ट आहे ती असं धनश्री म्हणाली.

धनश्रीनुसार, प्रेम फिल्मी असतं. ह्दयात घंटा वाजते. तुमच्यावर फुलांचा वर्षाव होतो. अशी फिलिंग कोणाला नकोय? प्रत्येकाला प्रेम मिळालं पाहिजे.