Dharashiv Kidnapping : एकतर्फी प्रेमात ठार वेडा, घरात घुसून तरुणीचं अपहरण, धाराशीवमध्ये अंगावर काटा आणणारा थरार, पोलिसांनी सुटका कशी केली?
या अपहरणाचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये मुख्य आरोपीच्या हातात दोन धारदार शस्त्रे दिसत आहेत. हेच शस्त्र घेऊन आरोपीने तरुणीच्या थेट घरात प्रवेश केला आणि तिचे अपहरण केले.

धाराशीव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीचं अपहरण केलंय. या प्रकरणी मुक्य आरोपीसह इतर तिघांना अटक करण्यात आलीय.
या अपहरणाचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये मुख्य आरोपीच्या हातात दोन धारदार शस्त्रे दिसत आहेत. हेच शस्त्र घेऊन आरोपीने तरुणीच्या थेट घरात प्रवेश केला आणि तिचे अपहरण केले.
तरुणीच्या अपहरणानंतर तिला कारमध्ये टाकून आरोपींनी पळ काढला. पोलिसांनीही तत्काळ सक्रीय होत आरोपींच्या कारचा पाठलाग केला. डीवायएसपी संजय पवार आणि पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे यांनी या घटनेचा थरार सांगितला आहे.
पोलिसांनी मोठ्या सिताफीने आरोपीशी संवाद साधत, तरुणीची सुखरूप सुटका करून घेतली. मुलीला रितसर तिच्या घरी पोहोचवण्यात आहे. अपहरण झालेली मुलगी जेव्हा पोलिसांच्या ताब्यात आली तेव्हा ती 'माझे पप्पा कुठे आहेत', अशी आर्त हाक देताना दिसत आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या हातातील शस्त्र हिसकावून घेतले. तसेच दुसरीकडे तरुणीची सुटका केली. या घटनेनंतर राज्यात मुली सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित केला जातोय.