Dhurandhar 2 : मे महिन्यात या तारखेला ओटीटीवर येणार ‘धुरंधर 2’; थेट कोर्टातच सांगितली तारीख

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2' हा चित्रपट मे महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. कोर्टात सुरू असलेल्या एका खटल्यादरम्यान निर्मात्यांनी ओटीटीच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल संकेत दिले आहेत.

| Updated on: May 08, 2026 | 1:11 PM
1 / 5
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2' हा चित्रपट 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यांनी अद्याप हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, त्यांना आता घरी बसल्या किंवा मोबाइलवर निवांत हा चित्रपट पाहता येणार आहे.

2 / 5
'धुरंधर 2'च्या ओटीटी रिलीजबाबत निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केली नाही, परंतु कोर्टात सुरू असलेल्या एका खटल्यादरम्यान स्ट्रीमिंगची तारीख समजू शकली आहे. 'त्रिदेव' या चित्रपटातील 'तिरछी टोपीवाले' या गाण्याला 'धुरंधर 2'मध्ये परवानगीशिवाय वापरल्यामुळे कॉपीराइटचा खटला दिल्ली हायकोर्टात सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान निर्मात्यांनी ओटीटीची तारीख कोर्टात सांगितली.

3 / 5
दिल्ली उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना मध्यस्थीद्वारे वाद सोडवण्यास सांगितलं होतं, परंतु ही मध्यस्थी होऊ शकली नाही. सुनावणीदरम्यान चित्रपटाच्या निर्मात्यांनी न्यायालयाला कळवलं की, 'धुरंधर 2' थिएटरमध्ये आधीच प्रदर्शित झाला आहे आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. सर्वसाधारणपणे ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आठ ते दहा आठवड्यांचा कालावधी लागतो.

4 / 5
येत्या 14 मे रोजी 'धुरंधर 2'ला थिएटरमध्ये आठ आठवडे पूर्ण होतील. त्यामुळे 'धुरंधर 2' हा 15 मे रोजी ओटीटीवर स्ट्रीम होऊ शकतो. रणवीरच्या 'धुरंधर'चा पहिला भाग नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. परंतु सीक्वेलसाठी निर्मात्यांनी जिओ हॉटस्टारसोबत करार केला आहे.

5 / 5
'धुरंधर 2'ने आतापर्यंत देशभरात तब्बल 1365 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रजर्शनाच्या 50 व्या दिवशीही या चित्रपटाने 50 लाख रुपये कमावले आहेत. तर जगभरातील कमाईचा आकडा 1791.55 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आमिर खानच्या 'दंगल'नंतर हा जगभरातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

Follow Us