
बॉक्स ऑफिसवर दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. त्यापैकी काही चित्रपट इतके यशस्वी ठरतात की त्या चित्रपटातील कलाकारांना एका रात्रीत स्टारडम मिळते.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे सारा अर्जुन जिने आपल्या पहिल्याच मुख्य भूमिकेच्या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे तिने स्वतःपेक्षा 22 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत रोमान्स करत पडद्यावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

तिचा पहिला लीड रोल असलेला चित्रपट धुरंधर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि या चित्रपटाच्या यशामुळे ती एका रात्रीत स्टार बनली. या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसला. दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली.

सारा अर्जुन ही केवळ अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही चर्चेत आहे. अनेक चाहत्यांच्या मते तिचे सौंदर्य हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि करिना कपूर यांनाही टक्कर देणारे आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्क्रीन प्रेझेन्सचेही खूप कौतुक झाले.

‘धुरंधर’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर सारा अर्जुन हिने IMDb च्या पॉप्युलर इंडियन सेलिब्रिटी यादीत अव्वल स्थान मिळवले. विशेष म्हणजे लोकप्रियतेच्या बाबतीत रणवीर सिंग आणि सारा अर्जुन यांनी शाहरुख आणि ऐश्वर्या राय यांसारख्या मोठ्या स्टार्सनाही मागे टाकल्याची चर्चा झाली.