Dhurandhar Akshaye Khanna : अक्षय खन्ना आज स्टार, पण त्याचे 5 महाफ्लॉप चित्रपट माहितीयत का? त्यातल्या 3 चित्रपटांची तुम्ही नावं सुद्धा ऐकली नसतील

Dhurandhar Akshaye Khanna : सध्या सगळीकडे अक्षय खन्नाने धुरंधर चित्रपटात रंगवलेल्या रहमान डकैतची चर्चा आहे. अक्षयचा हा चित्रपट ब्लॉक बस्टर बनण्याच्या मार्गावर आहे. मात्र, त्याआधी आम्ही तुम्हाला अक्षय खन्नाचे असे पाच चित्रपट सांगणार आहोत, जे बॉक्स ऑफिसवर आपटले. त्यातल्या तीन चित्रपटांची नाव सुद्धा फॅन्सनी ऐकली नसतील.

| Updated on: Dec 16, 2025 | 2:50 PM
1 / 5
'हिमालय पुत्र' (1997) चित्रपटातून अक्षय खन्नाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला. या चित्रपटात त्याच्यासोबत पिता आणि दिग्गज अभिनेते विनोद खन्ना सुद्धा होते. या चित्रपटाने 4 कोटी रुपयांपेक्षा पण कमी कमाई केलेली. त्याचं बजेट 4.25 कोटी रुपये होतं.

2 / 5
अक्षय खन्नाने पडद्यावर ऐश्वर्या राय सारख्या सुंदर अभिनेत्रीबरोबर काम केलं आहे. 1999 साली दोघांनी 'आ अब लौट चलें' चित्रपटात एकत्र काम केलेलं. 10 ते 12 कोटी रुपये या चित्रपटासाठी खर्च आलेला. 26 वर्ष हा जुना चित्रपट बॉक्स ऑफिसवर फक्त चार ते पाच कोटी रुपयांची कमाई करु शकलेला.

3 / 5
2007 साली आलेला चित्रपट 'नकाब' मध्ये अक्षय खन्नासोबत बॉबी देओलही होता. 18 वर्षापूर्वीच्या या चित्रपटाचं बजेट होतं, 20 कोटी रुपये.  भारतात या चित्रपटाने फक्त  12 कोटी रुपयांची कमाई केलेली. हा फिल्म सुपरफ्लॉप ठरलेली.

4 / 5
अक्षय खन्ना आणि सैफ अली खानचा 'लव के लिए कुछ भी करेगा' चित्रपटाची कल्ट चित्रपटात गणना होते. तिकीट खिडकीवर हा चित्रपट कमाल दाखवू शकला नव्हता. 5.75 कोटी रुपयात बनलेल्या या चित्रपटाने 5.57 कोटींची कमाई केली होती.

5 / 5
 2020 साली अक्षय खन्नाचा 'सब कुशल मंगल' चित्रपट रिलीज झाला. विश्वनाथ कश्यपने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं. या चित्रपटाचं बजेट 15 कोटीच्या आस-पास होतं. पण तिकीट खिडकीवर हा चित्रपट फक्त एक कोटी रुपयेच कमावू शकलेला.