
हिरा ही अशी गोष्ट आहे, ज्याच्याबद्दल प्रत्येकालाच कुतुहल आणि आकर्षण असते. हिऱ्यांची किंमत कित्येक लाखांत, कोटींमध्ये असू शकते. त्यामुळेच हिऱ्याला एवढे महत्त्व आहे.

आपल्या अंतरळात असे दोन ग्रह आहेत, जिथे चक्क हिऱ्यांचा पाऊस पडतो, असे म्हटले जाते. हा हिऱ्यांचा पाऊस अजूनही एक रहस्य असून अनेकांना याबाबत उत्सुकता आहे

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार युरनेस आणि नेपच्यून या दोन ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस पडतो. यामागील खरे कारणही आता समोर आले आहे.

युरेनस आणि नेपच्यून हे आपल्या आकाशगंगेतील सर्वात दूर असणारे ग्रह आहेत. हे दोन्ही ग्रहांवर मिथेन नावाचा वायू आहे. मिथेनमध्ये कार्बन हा घटक असतो. कार्बन हा हिऱ्यामध्ये असलेल्या प्रमुख घटकांपैकी एक आहे.

युरनेस आणि नेपच्यून या दोन्ही ग्रहांच्या वरच्या वायूमंडळात मिथेनचे प्रमाण हे दोन टक्के असते. दबावामुळे मिथेन वायूचे मॉल्यूक्युल्स तुटतात. त्यानंतर मिथेनमधील कार्बनचे अणून वेगवेगळे होतात. हिऱ्यांच्या निर्मितीचे ही पहिली पायरी आहे.

उच्च तापमानामुळे मिथेनमधून वेगळे झालेले कार्बन एकत्र येतात आणि एकजीव होतात. पुढे त्यापासून हिरे तयार होतात. त्यानंतर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हे हिरे या दोन्ही ग्रहांच्या खाली यायला लागतात. यालाच डायमंड रेन म्हटले जाते.

युरेनस, नेपच्यून ग्रहांवरील दबाव, तापमान आणि गुरुत्वाकर्षण यामुळे तिथे हिरे तयार होतात असे सांगितले जाते. (टीप- ही स्टोरी इंटरनेटवर असलेल्या प्राथमिक माहितीवर आधारित आहेत. सखोल माहितीसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)