दीपिकाचं मन मोठं; स्वत: कॅन्सरमधून सावरताना नणंदेच्या मुलासाठी दिले तब्बल इतके रुपये

अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या युट्यूब व्लॉगद्वारे चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. नुकत्याच एका व्लॉगमध्ये तिने तिच्या 'फॅमिली गेट टुगेदर'ची झलक दाखवली. यावेळी नणंद सबा इब्राहिमच्या मुलाला मोठी भेट दिल्याचंही तिने सांगितलं आहे.

| Updated on: Sep 03, 2025 | 9:42 AM
1 / 5
'ससुराल सिमर का' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर आणि तिचा पती शोएब इब्राहिम त्यांच्या युट्यूब व्लॉगद्वारे चाहत्यांना खासगी आयुष्यातील विविध अपडेट्स देत असतात. नुकतंच शोएब-दीपिकाच्या घरात फॅमिली गेट-टुगेदर झालं.

2 / 5
शोएबची बहीण सबा इब्राहिम तिच्या चिमुकल्या मुलाला घेऊन भावाच्या घरी आली होती. यावेळी दीपिकाने तिच्या नणंदला सर्वांत मोठं सरप्राइज दिलं. दीपिका आणि शोएब यांनी सबाच्या मुलाच्या नावावर एक पॉलिसी घेतली.

3 / 5
ही एक गुंतवणूक पॉलिसी आहे, जी 51 लाख रुपयांची आहे. दीपिकाने चिमुकल्या हैदरला ही मोठी भेटवस्तू देताच सबा भावूक झाली होती. भाऊ आणि वहिनीचं मोठं मन पाहून तिला अश्रू अनावर झाले.

4 / 5
सबाच्या मुलाचं भविष्य सुरक्षित राहावं, यासाठी ही पॉलिसी घेतल्याचं दीपिकाने सांगितलं. दोघांचं इतकं प्रेम पाहून सबा रडू लागली. सबाचा मुलगा हैदर जसजसा मोठा होईल, तसतसं त्याच्या नावावर पैशांची गुंतवणूक होत राहील.

5 / 5
भाऊ आणि वहिनीने दिलेल्या या भेटीबद्दल सबाने आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे दीपिकाला कॅन्सरचं निदान आणि तिच्यावरील उपचार या सर्व गोष्टी असतानाही त्यांनी हैदरचा विचार केला, हे जाणून सबा खूपच भावूक झाली होती.