
धनु :धनु राशीच्या लोकांसाठी हा कालावधी अतिशय शुभ आहे. ग्रहांची हालचाल या लोकांसाठी अनुकूल परिणाम घेऊन येण्याची शक्यता आहे. धनु राशीच्या लोकांना पैसे कमावण्याचे नवे मार्ग, नवीन स्रोत मिळू शकतात. या दिवाळीत धनु राशीचे लोक सकारात्मक परिणामाची अपेक्षा करू शकतात.

वृश्चिक: दिवाळीचा कालावधी वृश्चिक राशीसाठी देखील फायदेशीर आहे. जी लोकं नोकरी करतात त्यांची दखल घेतली जाईल. अशा लोकांच्या मेहनतीची, प्रयत्नांची दखल घेतली जाईल. या काळात जर कुणी नोकरी शोधात असेक तर त्यांना नोकरीत आणि व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात नवीन संधी मिळेल.

सिंह : सिंह राशीच्या सदस्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण राहील. या राशीच्या लोकांची दिवाळीत आर्थिक वाढ होईल. कौटुंबिक स्थिती सुधारेल आणि वेगवेगळ्या कामामध्ये यश मिळेल.

कर्क: कर्क राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी लकी आहे. या दिवाळीत कर्क राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. पैसे खर्च करताना सावधगिरी बाळगा. मुलांकडून सकारात्मक बातमी मिळेल.

मेष: ही दिवाळी मेष राशीच्या लोकांसाठी सौभाग्य घेऊन येईल. ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील.