AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंडपाकडे जाताना रश्मिका मंदानाच्या हातातील हिरव्या वस्तूचा अर्थ काय? का घेऊन चालत जातात? कारण ऐकून…

लग्नाच्या वेळी मंडपाकडे जाताना रश्मिका मंदानाच्या हातात दिसणाऱ्या या गोष्टीची जोरदार चर्चा, काय आहे याचं कारण?

मंडपाकडे जाताना रश्मिका मंदानाच्या हातातील हिरव्या वस्तूचा अर्थ काय? का घेऊन चालत जातात? कारण ऐकून...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 01, 2026 | 10:38 AM
Share

Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा विवाहबंधनात अडकले आहेत. त्याच्या लग्नानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या शाही अंदाजात पार पडलेल्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून दोघांच्या वेषभूषा आणि दागिन्यांची जोरदार चर्चा रंगली आहे.

मात्र, या सर्वांमध्ये एका गोष्टीने विशेष लक्ष वेधले ते म्हणजे रश्मिका मंडपाकडे जात असताना तिच्या हातात नारळ होता. अनेकांना याबाबत एक प्रश्न पडला आहे. पण तेलुगू विवाहपरंपरेत याला अत्यंत महत्त्व आहे.

तेलुगू परंपरेत नारळाचे स्थान

तेलुगू संस्कृतीत नारळाला अत्यंत पवित्र मानले जाते. स्थानिक भाषेत त्याला ‘कोब्बरी बोंडम’ असे म्हटले जाते. कोणत्याही शुभकार्याच्या वेळी नारळाचा वापर अनिवार्य मानला जातो. विवाहासारख्या मंगल प्रसंगी नारळ शुद्धता, भक्तीभाव आणि देवाच्या आशीर्वादाचे प्रतीक मानला जातो. वधूने हातात नारळ घेऊन मंडपाकडे जाणे म्हणजे ती नव्या आयुष्याची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि शुभ ऊर्जा घेऊन करत असल्याचे प्रतीक असते.

तेलुगू विवाहसंस्कृतीनुसार नारळ तीन महत्त्वाच्या गोष्टींचे प्रतीक मानला जातो. नव्या आयुष्याची सुरुवात पवित्रतेने व्हावी, अशी भावना. वैवाहिक जीवन सुखी आणि भरभराटीचे राहावे अशी कामना. वाईट नजरेपासून आणि अडचणींपासून बचावाचे प्रतीक. नारळाचे कठीण बाह्य आवरण जीवनातील संघर्ष आणि आव्हाने दर्शवते तर आतला शुभ्र भाग पवित्रता, प्रामाणिकपणा आणि निर्मळ भावनांचे प्रतीक मानला जातो.

इतर पारंपरिक घटकांनाही तितकेच महत्त्व

तेलुगू लग्नात नारळासोबत खायची पाने, सुपारी, हळद आणि कुंकू यांनाही विशेष महत्त्व असते. विवाहपूर्व विधींमध्ये दोन्ही कुटुंबांकडून या वस्तूंची देवाणघेवाण केली जाते. हळद शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. कुंकू हे सौभाग्य आणि मंगलमय वैवाहिक जीवनाचे चिन्ह मानले जाते. पान-सुपारी प्रेम, ऐक्य आणि सुसंवादाचे प्रतीक मानले जाते.

रश्मिकाच्या हातातील नारळामुळे तेलुगू परंपरेबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अनेक चाहत्यांनी या प्रथेचे कौतुक करत भारतीय विवाहसंस्कृतीतील विविधतेची आठवण करून दिली. रश्मिका आणि विजय यांच्या लग्नसोहळ्याने केवळ ग्लॅमरच नाही तर परंपरा आणि संस्कृतीचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. त्यांच्या आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...