
धनत्रयोदशीला लोकं धनाची पूजा करतात, पण धनत्रयोदशीला धनाची पूजा करणं योग्य आहे की अयोग्य? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? धनत्रयोदशीबद्दल सांगायचं झालं तर, विष्णुपुरानात सत्य थोडं वेगळं सांगितलं आहे. तर ते सत्य काय आहे? ते नीट जाणून घ्या...

समुद्रमंथन करताना एक देव प्रकट झाले. त्यांचं नाव होतं भगवान धन्वंतरी... तुम्हाला असं वाटेल की, धन म्हणजे पैशांसंबंधी देव असेल, पण असं नाहीये...

समुद्रमंथन झालं तेव्हा जगातील पहिल्या डॉक्टरांचा जन्म झाला. ज्यांनी जगाला आर्युर्वेद दिलं... म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही बघाल अनेक डॉक्टर, वैद्य धन्वंतरीची पूजा करतात.

अनेक जण धनत्रयोदशीला धनाची पूजा करतात आणि लक्ष्मीपुजनाला देखील तसंच करतात. अशात दोघांमध्ये फरक काय? तर धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा करतात आणि लक्ष्मीपुजनाला धनाची पूजा करतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)