
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, मानवाने काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जीवनमान बदललं असलं तरी मानवी स्वभावात काही बदल झालेला नाही. आजही माणूस तसाच विचार करत असतो. त्यामुळे मानवी मनावर काय परिणाम होत असेल? याचा अभ्यास आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात केला आहे. आचार्य चाणक्य यांनी पाच ठिकाणी व्यक्तींनी चुकूनही जाऊ नये असा ठामपणे बजावलं आहे.

मनुष्याने कायम लक्षात ठेवावं की, जिथे आपल्याला मान नाही तिथे कधीच जाऊ नये. अशा ठिकाणी तुमचा कायम अपमान होत राहील. त्यामुळे तुमचं नुकसान होईल आणि आत्मसन्मान गमावून बसाल. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊच नये, असं नीतिशास्त्र सांगतं.


कोणत्याही अनोळखी ठिकाणी राहणं काही दिवस आवडेल. पण काही दिवस गेल्यानंतर घरची आठवण आल्याशिवाय राहाणार नाही. पण जेव्हा एखादी अडचण उभी राहते तेव्हा मदतीला जवळचं कोणी नसतं. तेव्हा एकाकी वाटतं. त्यामुळे जिथे मित्र किंवा नातेवाईक नाहीत अशा ठिकाणी फार काळ राहू नये.

