साप खरंच आपल्या जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतात का? 99 टक्के लोकांना माहीत नसते हे सत्य

अनेकदा सापांबद्दल असं बोललं जातं की ते आपल्या जोडीदारांच्या मृत्यूचा बदला घेतात. मात्र हे खरंच असं होतं का? साप मृत सापाच्या डोळ्यात पाहून आपल्या जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतो का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

| Updated on: Apr 26, 2026 | 4:37 PM
1 / 7
तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की, जर एखाद्या व्यक्तीने साप मारला की त्याची नागिन त्या मेलेल्या सापाच्या डोळ्यात पाहून आपल्या नागाच्या शत्रूचा बदला घेते, त्याला दंश करते. तुम्हाला हे पाहून कधी असा प्रश्न पडला आहे का, की खरंच साप एखाद्या व्यक्तीचा अशाप्रकारे बदला घेऊ शकतो का?

तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की, जर एखाद्या व्यक्तीने साप मारला की त्याची नागिन त्या मेलेल्या सापाच्या डोळ्यात पाहून आपल्या नागाच्या शत्रूचा बदला घेते, त्याला दंश करते. तुम्हाला हे पाहून कधी असा प्रश्न पडला आहे का, की खरंच साप एखाद्या व्यक्तीचा अशाप्रकारे बदला घेऊ शकतो का?

2 / 7

सापांबद्दल अनेक रोचक तथ्य आहेत, जसं की तुम्ही वर्तमान पत्र किंवा टीव्हीवरही अशा घटना पाहील्या असतील, ज्या घटनेत एकाच व्यक्तीला वारंवार साप चावण्याची घटना घडते, हे असं का होतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का?

3 / 7

साप कधी कोणत्या व्यक्तीचा बदला घेऊ शकतो का तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. वैज्ञानिकांच्या मते सापांचा मेंदू हा विकसीत झालेला नसतो, त्यामुळे कोणताही व्यक्ती लक्षात ठेवण्याचा प्रश्नच नाही.

4 / 7

त्यामुळे साप कधीही कोणत्याही व्यक्तीचा बदला घेऊ शकत नाही, मात्र तुम्ही जर त्याच्या मार्गात आलात आणि त्याला धोका जाणवला तर मात्र तो तुम्हाला दंश करू शकतो.

5 / 7

अनेकदा तुम्ही असं देखील पाहिलं असेल की एखादा साप मेला आहे आणि तिथे वारंवार एक नागिन किंवा त्याचा जोडीदार असलेला दुसरा सर्प घुटमळत आहे. हे असं का होतं?

6 / 7

त्यामागे देखील एक वैज्ञानिक कारण आहे, जेव्हा साप मरतो तेव्हा त्यांच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा गंध येण्यास सुरुवात होते, हा गंध त्या सापाकडे त्याच्या जोडीदाराला आकर्षित करते.

7 / 7

त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की साप कधीही कोणाचा बदला घेत नाही, त्याला धोका जाणवला तरच तो तुमच्यावर हल्ला करतो, तुम्हाला दंश करण्याची शक्यता असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us