आता करा अंडरवॉटर फोटोग्राफी; Realme GT 7 Pro चा बाजारात धमका, उद्यापासून प्री-बुकिंगची सुविधा

Realme GT 7 Pro Underwater Photography : रिअलमी जीटी 7 प्रो या मोबाईलने अनेकांना वेड लावले आहे. हा फोन भारतात लवकरच लाँच होणार आहे. या स्मार्टफोनमुळे ग्राहकांना अंडरवॉटर फोटोग्राफीची हौस भागवता येणार आहे. उद्यापासून प्री-बुकिंग सुरू होत आहे.

| Updated on: Nov 17, 2024 | 5:20 PM
1 / 6
Realme GT 7 Pro हा स्मार्टफोन सध्या चर्चेत आला आहे. या देशाने मोबाईल जगतात धमाका केला आहे.  Underwater Photography साठी हा धमाकेदार फोन ठरणार आहे.

Realme GT 7 Pro हा स्मार्टफोन सध्या चर्चेत आला आहे. या देशाने मोबाईल जगतात धमाका केला आहे. Underwater Photography साठी हा धमाकेदार फोन ठरणार आहे.

2 / 6

रिअलमीचा स्मार्टफोन 26 नोव्हेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे. सुरुवातीला हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता.

3 / 6

कंपनीने भारतातील युझर्ससाठी या स्मार्टफोनचे प्री-बुकिंग सुरु केले आहे. उद्यापासून ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने ग्राहकांना या फोनसाठी बुकिंग करता येईल.

4 / 6

Realme GT 7 Pro भारतातील पहिला स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरवाला स्मार्टफोन असेल. तो AAA गेमिंग टायटलचा सपोर्ट असणारा फोन आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे.

5 / 6

हा इंडस्ट्रीमधील पहिला अंडरवॉटर फोटोग्राफी मोड असलेला स्मार्टफोन आहे. त्याचा मदतीने युझर्स 2 मीटर खोल पाण्यात सुद्धा फोटो घेऊ शकतील.

6 / 6

उद्या 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून रिअलमी आणि Amazon वा ऑफलाईन स्टोअरवर जाऊ तुम्ही प्री बुकिंग करू शकता. ऑनलाईन प्री बुकिंगसाठी 1 हजार तर ऑफलाईन प्री-बुकिंगसाठी 2 हजार रुपये मोजावे लागतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us