मुंबईतील हिरवळीची पुन्हा कत्तल; अदानींच्या धारावी पुनर्विकाससाठी महापालिका झाडांवर कुऱ्हाड चालवणार
Adani Dharavi Redevelopment Trees cut: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी पुन्हा एकदा मुंबईतील हिरवळीवर कुऱ्हाड कोसळणार आहे. यापूर्वी बुलेटन प्रकल्पासाठी वृक्षतोडीवरून मोठे आंदोलन झाले होते. मुंबईच्या हरितक्षेत्राला पुन्हा एकदा बोट लावण्यात येत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

Adani Dharavi Redevelopment Trees cut: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जागेवरील 477 झाडांवर महापालिका कुऱ्हाड चालवण्याच्या तयारीत आहे. याबाबत बुधवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांत लेखी स्वरुपात या प्रस्तावावर हरकती व सूचना नोंदवा, असे आवाहन पालिकेने केले आहे. धारावीचा पुनर्विकास अदानी नवभारत मेगा डेव्हलपर्स या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. धारावी पुनर्विकासात कुर्ल्यातील 477 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. मात्र 1,682 झाडे पुनर्स्थापित करणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
इमारत उभारणीसाठी झाडांची कत्तल
धारावीतील पात्र रहिवाशांचे धारावीतच पुनर्वसन करण्यात येणार आहे तर अपात्र रहिवाशांचे कुर्ला, मुलुंड, मालाड आदी ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी कुर्ला पूर्व येथील मदर डेअरीची जागा या प्रकल्पासाठी हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यानुसार, इमारती उभारण्यासाठी मदर डेअरीच्या जागेवरील 477 झाडे तोडण्यात येणार असून 1,682 झाडे पुनर्स्थापित करण्यात येणार असल्याचा दावा मुंबई पालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे.
7 ऑक्टोबर रोजी सुनावणी
प्रस्तावित विकासकामासाठी बाधित होणाऱ्या झाडांची पाहणी करण्यात येईल. त्यापैकी झाड काढणे, त्याची पुनर्स्थापित करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. हरकती, सूचना प्राप्त झाल्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील कार्यालयात सुनावणी होणार आहे. धारावीतील पात्र रहिवाशांचे धारावीतच पुनर्वसन करण्यात येणार आहे. तर अपात्र रहिवाशांचे कुर्ला, मुलुंड, मालाड आदी ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी कुर्ला पूर्व येथील मदर डेअरीची जागा या प्रकल्पासाठी हस्तांतरीत करण्यात आली आहे. इमारत उभारण्यासाठी मदर डेअरीच्या जागेवरील 477 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे.
अजब फतवा
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी या परिसरातील आठ हजार झाडे बाधित होणार आहेत. ही झाडे तोडल्यावर कथित भरपाई म्हणून 90 किमी दूर पालघर जिल्ह्यात 90 एकर जमिनीवर 22,904 झाडे लावण्याचा अजब दावा करण्यात येत असल्याने सर्वच चक्रावले आहेत.
