
सापांबाबत अनेक गैरसमज आहेत, या गैरसमजामुळे दरवर्षी अनेक सापांचा बळी जातो. त्यामुळे दुर्मिळ प्रजातीचे साप सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्येक साप हा विषारीच असतो हा सर्वात मोठा गौरसमज आहे.

भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी आहेत, त्यामध्ये घोणस, मण्यार, नाग ज्याला आपण किंग कोब्रा असं देखील म्हणतो आणि फुरसे या जातींचा समावेश होतो.

मात्र तुमच्या घरात कुठलाही साप आढळला तर त्याला पकडण्याची किंवा मारण्याची चूक करू नका, त्याची माहिती तुमच्या परिसरातील सर्पमित्राला द्या, ते त्याला त्यांच्या संरक्षित अधिवासात सोडतील.

घरात स्वच्छता ठेवली, घरात कचरा आणि अडचण नसेल तर साप घरामध्ये फिरकत नाहीत, मात्र अस्वच्छता असेल तर घरामध्ये साप प्रवेश करू शकतात.

मात्र काही झाडं आणि वनस्पती अशा असतात ज्यामुळे साप तुमच्या घरात प्रवेश करू शकतात, या वनस्पतींना असलेल्या विशिष्ट वासांमुळे आणि गुणधर्मांमुळे सापांचा कायम वावर या झाडांखाली असतो, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

लिंबू आणि चंदन या दोन वनस्पती तुमच्या घराच्या आसपास न लावण्याचा सल्ला दिला जातो. कारण या वनस्पतीच्या विशिष्ट वासामुळे साप या झाडांकडे आकर्षित होतात. या दोन्ही झाडांना दाट पानं असतात.

दाट पानांमुळे सापाला लपण्यासाठी जागा सापडते, तसेच चंदन आणि लिंबाच्या झाडावर पक्षाची घरटे देखील असतात त्यामुळे सापांच्या खाद्याची देखील सोय होते, त्यामुळे कायम या झाडांखाली सापांचा वावर असतो.( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)