
स्विस बँकेचे नाव ऐकले आपल्या समोर पुढाऱ्यांचा काळा पैसा येतो. भारतात हा मुद्दा भाजपला सत्ता प्राप्तीसाठी महत्त्वाचा ठरल्याचे म्हटले जाते. ही बँक समोर येताच कोट्यवधींच्या ठेवी, सुरक्षा आणि गोपनिय हे शब्द आपसूकच एका पाठोपाठ येतात. अनेकांना या बँकेत पैसा ठेवला तर झपाट्याने वाढतो असं वाटतं, पण काय आहे त्यामागील सत्य? एक वर्ष जर या बँकेच्या खात्यात रक्कम ठेवली तर रक्कम वाढते का कमी होते?

स्वित्झर्लंडची बँक अनेक दशकांपासून मजबूत बँकिंग प्रणाली, कडक नियम, गोपनियतेचा नियम यामुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. जगभरातील अनेक श्रीमंत लोकांची येथील अनेक बँकेत खाती आहेत. याठिकाणी जगभरातील पुढारी पैसा लपवतात असे मानले जाते. येथील बँकेत पैसा सुरक्षित राहतो असे मानले जाते.

येथील आर्थिक यंत्रणा जोखिमेऐवजी स्थिरतेला प्राधान्य देते. त्यामुळे स्विस बँकेतील रक्कमेवर अधिक परतावा मिळत नाही. कारण येथे पैसा हा वृद्धीसाठी जमा करण्यात येत नाही तर पैसा हा सुरक्षित राहण्यासाठी ठेवण्यात येतो. त्यामुळे इथं पैसा हा वाढत नाही. तर सुरक्षित राहतो.

स्विस बँका या रिटेल बँक सेव्हिंग खात्यावर जवळपास 0 टक्के अथवा काही वेळा अधिकच बोटावर मोजण्याइतके व्याज देते. त्यामुळे येथील बँकेत जेव्हा पैसा जमा करण्यात येतो. तेव्हा त्यावर व्याज फारसं मिळत नाही. उलट रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी मात्र प्रक्रिया शुल्क आकारले जाते.

भारतीय बँका ठेवीवर आणि बचतीवर व्याज यासाठी देतात कारण की या बँका जमा रक्कम कर्जाने देतात आणि त्यावर मोठा नफा कमवातात. त्यातील काही रक्कम मग या ठेवीदारांना आणि बचत खातेदारांना देण्यात व्याज रुपात देण्यात येते. पण स्वित्झर्लंडचे बँकिंग मॉडल वेगळे आहे. तिथले सरकार आणि मध्यवर्ती बँक महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि चलन मजबूत असावे यासाठी काम करते.

त्यामुळे स्विस बँकेतील बचत खात्यावर नाममात्र व्याज अथवा काहीच व्याज मिळत नाही. जर एखादा व्यक्ती मुदत ठेव करते, तर बचतीपेक्षा या डिपॉझिटवर थोडं अधिक व्याज मिळते. पण हा व्याजदर भारतीय बँकांपेक्षा खूपच कमी असते. अर्थात हा व्याजदर मुदत ठेवीचा कालावधी आणि रक्कमेवर अवलंबून असतो.