तुम्हाला काळा गहू माहीत आहे का? काय आहेत खास वैशिष्ट्ये? जाणून घ्या
काळा गव्हाचं वाण 2017 विकसित झालं. काळ्या गव्हाचे वैशिष्ट्ये जाणून घ्या.

- भारतात गहू हे अनेकांच्या आहारातील प्रमुख धान्य आहे. अनेकांसाठी गव्हाच्या चपातीशिवाय भारतीय जेवण अपूर्ण म्हटले तरी वावगं ठरणार नाही.
- एका मीडिया रिपोर्टनुसार, बाजारात सोनेरी, वजनदार गव्हाला सर्वाधिक पंसती दिली जाते. परंतु राष्ट्रीय कृषी अन्न जैवतंत्रज्ञान संस्थेने काळ्या गव्हाचा वाण देखील विकसित केलाय.
- काळा गहू अनेक व्याधींमध्ये उपयुक्त ठरतो. काळा गहू हा कॅन्सर, मधुमेह, ताणतणाव, हृदयरोग, स्थुलता असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतो.
- काळ्यात गव्हात सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅंगेनीज, जस्त, अँटीऑक्सिडंट्स, बी जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम, लोह, तांबे, पोटॅशियम, फायबर, अमिनो अॅसिड आढळून येते. या कारणामुळे यात पोषणमूल्य अधिक आहे. अँटीऑक्सिडंट्समुळे व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते .
- अॅन्थोसायनीन हा घटक जांभूळ, ब्लूबेरीत आढळून येतो. परंतु दोन्ही पदार्थ वर्षभर उपलब्ध होत नाहीत. पण काळा गहू उपलब्ध होऊ शकतो.
- राष्ट्रीय कृषी अन्न जैवतंत्रज्ञान संस्थेत काळ्या गव्हाचे 2017 साली संशोधन झालं. तब्बल 7 वर्षांनंतर या गव्हाचं वाण विकसित झालं. या गव्हाला ‘नबी एमजी’ असं नाव देण्यात आलंय.
Follow Us