अंडी खायला आवडतात, पण योग्य प्रकारे कसं खावं माहितीये? घ्या जाणून

अंड्यामध्ये व्हिटॅमिन A, B, B12 आणि व्हिटॅमिन डी, ई यांचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे डॉक्टर देखील अंडी खाण्याचा सल्ला देतात. लहान मुलांना देखील अंडी खायला प्रचंड आवडतात. पण अंडी खाण्याचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? तर ते जाणून घ्या...

| Updated on: Oct 25, 2025 | 10:16 AM
1 / 5
कच्चे किंवा अर्धवट शिजलेलं अंडे (half-boiled) खाणं टाळा. अशा अंड्यांमध्ये Salmonella सारख्या जंतूंमुळे अन्नविषबाधा होऊ शकते. अंड्याचा पांढरा भाग आणि पिवळा बलक दोन्ही शिजलेले असावेत.

2 / 5
सकाळच्या नाश्त्यात खाणे अंडे सर्वोत्तम मानलं जातं. सकाळी अंडे खाल्ल्याने ऊर्जा मिळते आणि पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. पण रात्री झोपण्यापूर्वी अंडे खाल्ल्यास पचनास त्रास होऊ शकतो.

3 / 5
अंडी तळण्याऐवजी उकडून किंवा कमी तेलात शिजवून खा. डीप फ्राय किंवा बटरमध्ये शिजवलेल्या अंड्यांमुळे चरबी वाढते. oiled egg, poached egg, steamed omelet हे सर्वात आरोग्यदायी पर्याय आहेत.

4 / 5
बलकाचं प्रमाण मर्यादित ठेवणं देखील महत्त्वाचं आहे.. दररोज 1 अंड्याचा बलक आणि 1- 2 अंड्याचे पांढरे भाग हे प्रमाण सुरक्षित मानले जाते.ज्या महिलांना कोलेस्टेरॉल किंवा हृदयविकाराचा धोका आहे त्यांनी बलक कमी खावा.

5 / 5
ताजी अंडी जास्त पौष्टिक आणि सुरक्षित असतात. भाज्या किंवा धान्यांसोबत अंडे खा. फक्त अंडे खाल्ल्याने फायबर कमी मिळते. पालक, टोमॅटो, कांदा, किंवा चपातीसोबत अंडे खाल्ल्यास संतुलित आहार मिळतो. प्रथिने पचवण्यासाठी शरीराला पाणी आवश्यक असते. नियमित व्यायामामुळे अंड्यातील प्रथिनांचे उपयोग स्नायूंच्या वाढीसाठी होतात.