ब्रेकअपनंतरही अनेकजण एक्सचे सोशल मीडिया का बघत असतात? समोर आली 3 मोठी कारणं

अनेक मुलं मुली हे ब्रेकअप झाल्यानंतर देखील एकमेकांचे सोशल मीडिया बघताना दिसतात. पण ही सवय का लागते? मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितली 3 कारणं.

| Updated on: Oct 27, 2026 | 4:50 PM
1 / 5
ब्रेकअप झाल्यानंतर अनेक जण आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नातं संपलं असलं तरी काही जण वारंवार आपल्या एक्सचे सोशल मीडिया प्रोफाइल, स्टेटस आणि फोटो पाहत राहतात.

ब्रेकअप झाल्यानंतर अनेक जण आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नातं संपलं असलं तरी काही जण वारंवार आपल्या एक्सचे सोशल मीडिया प्रोफाइल, स्टेटस आणि फोटो पाहत राहतात.

2 / 5

समोरच्या व्यक्तीसोबत पुन्हा नातं जोडण्याची इच्छा नसतानाही ही सवय कायम राहू शकते. मग असं का होतं? यामागे काही मानसिक कारणं असू शकतात. जाणून घेऊयात सविस्तर

3 / 5

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, बेंगळुरू येथील मार्गा माइंड केअरचे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट सुहास यांनी या सवयीमागील कारणांवर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या ब्रेकअपनंतरही आपल्या एक्सच्या आयुष्यात काय सुरू आहे, तो किंवा ती कशी आहे, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. सोशल मीडियावर वारंवार दिसणारे फोटो, स्टेटस आणि पोस्ट ही उत्सुकता आणखी वाढवतात.

4 / 5

पूर्वी नातं संपल्यानंतर समोरच्या व्यक्तीशी संपर्क नसल्यास तिच्याबद्दल माहिती मिळवणं कठीण होतं. मात्र, आता सोशल मीडियामुळे दोघेही एकाच डिजिटल जगात असतात. त्यामुळे एक्सची एखादी पोस्ट किंवा फोटो अचानक दिसल्याने जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होऊ शकतात.

5 / 5

ब्रेकअपनंतर एक्स आनंदी दिसत असेल, मित्रमैत्रिणींसोबत फिरत असेल किंवा आयुष्यात यशस्वी होत असेल तर काही जण स्वतःची त्याच्याशी किंवा तिच्याशी तुलना करू लागतात. समोरची व्यक्ती ब्रेकअपनंतर कशी जगत आहे हे जाणून घेण्याची इच्छा त्यांना वारंवार सोशल मीडिया पाहण्यास प्रवृत्त करू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us