
मित्रांसोबत, पिकनिमध्ये मद्यपानाची पार्टी केल्यानंतर अनेकदा दारुच्या बॉटलमध्ये अर्धी दारू तशीच शिल्लक राहते. हीच शिल्लक राहिलेली दारू नंतर अनेकजण दुसऱ्या दिवशी किंवा कधीतरी पिऊन घेतात. परंतु बॉटलमध्ये शिल्लक राहिलेली दारू खरंच पिण्यायोग्य असते का? यासह एकदा बॉटलचे झाकण काढल्यानंतर दारूमध्ये काही बदल होतो का? दर्जा कायम राहतो का? असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल.

एकदा दारुच्या बॉटलचे झाकण उघडले की त्या दारुसोबत काय-काय होते? याचे उत्तर फारच आश्चर्यकार आणि मजेदार आहे. मद्याची गुणवत्ता ही मद्याची किंमत किंवा ब्रँडवर अवलंबून नसते. त्या दारूला किती दिवस स्टोअर करून ठेवलेले आहे, यावरून मद्याची गुणवत्ता ठरते. अनेकांना वाटते की मद्य कधीच खराब होत नाही. सत्य मात्र काही वेगळंच आहे.

बिअर, वाईन, व्हिस्की, रम, ब्रँडी, टकीला अशा मद्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांची स्वत:ची अशी सेल्फ लाईफ असते. एकदा का दारुच्या बॉटलचे झाकण उघडले की हळूहळू ती चवहीन, गंधहीन होते. तुम्ही दारूचे झाकण एकदा उघडले की त्यातील मद्याची चव हळूहळू कमी व्हायला लागते. व्हिस्की, रम यासारख्या मद्यांची चव बदलायला लागते.

सोबतच दारूच्या बॉटलचे झाकण उघडले की त्यातील अल्कोहोलचेही प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागते. त्यामुळे मद्याप्राशन केल्याने येणारी नशाही हळूहळू कमी होते. काचेच्या बॉटलमध्ये असलेली दारू ही सुरक्षित मानली जाते. काचेच्या बॉटलमधील मद्य प्लॅस्टिकच्या किंवा अन्य धातूच्या ग्लासमध्ये टाकल्यास त्याची चव हळूहळू बदलायला लागते.

दारुचे झाकण उघडे करू ठेवल्यास दोन ते तीन दिवासांत तिची चव बदलायला लागते. रेड वाईनची चव बदण्याचा वेग कमी असतो. व्हाईट वाईन मात्र लवकर खराब होते. (टीप- या स्टोरीतील इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारलेली आहे. मद्यप्राशन करणे आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशन करू नये.)