Nepal Calling : भारत आणि नेपाळ अंतर्गत विमान सेवा सुरू, ‘हे’ आहेत अनलॉकचे नवीन नियम

| Updated on: Dec 12, 2020 | 2:57 PM

नेपाळ आणि भारतामध्ये एअर बबल अरेंजमेंट अंतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. (Domestic flights between India and Nepal)

1 / 5
नाताळ आणि नवीनवर्षाला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आता आनंदाची बातमी आहे. आता नेपाळ आणि भारतामध्ये एअर बबल अरेंजमेंट अंतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.

2 / 5
सुरुवातीला ही सेवा दिल्ली ते काठमांडू अशी असेल. मात्र सध्या दररोज एकच विमान उपलब्ध असणार आहे.  मात्र हळुहळू ही संख्या वाढवण्यात येणार आहे.

3 / 5
नुकतेच परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी नेपाळ दौरा केला. प्रवासादरम्यान प्रवासी नागरिकांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल.

4 / 5
भारत आणि नेपाळमधील उड्डाणांमध्ये सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.  नेपाळ आणि भारतीय व्हिसा धारकांना प्रवासाची परवानगी असेल. तर ज्या लोकांकडे पर्यटक व्हिसा आहे त्यांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

5 / 5
 नेपाळची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे.दरवर्षी लाखो पर्यटक नेपाळला भेट देतात. नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्ट, अन्नपूर्णा सर्किट आणि एव्हरेस्ट बेस कॅम्पला भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.