Donald Trump : टॅरिफ कार्डमुळे अमेरिकेचा किती फायदा? हे आकडे सरकारची झोप उडवणार

Donald Trump Tariff : 'Make America Great Again' या साठी ट्रम्प यांनी टॅरिफ कार्ड खेळलं आहे. त्याचा भारतासह जगभरातील अनेक देशांना फटका बसत आहे. पण अमेरिकेचा मोठा फायदा झाला आहे. ही आकडेवारी सरकारची झोप उडवणारी आहे.

| Updated on: Aug 28, 2025 | 4:58 PM
1 / 6
अमेरिकेचे अर्थमंत्री, ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांच्या मते, ट्रम्प यांचे हे धोरण सरकारची कमाई वाढवण्यासाठी सुरू आहे. अमेरिका केवळ टॅरिफच्या माध्यमातूनच प्रत्येक वर्षी 500 ते 1000 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 1 ट्रिलियन इतकी कमाई करेल.

2 / 6
यापूर्वी बेसेंट यांनी 300 अब्ज डॉलरच्या कमाईचा अंदाज बांधला होता. आता त्यांनी हा आकडा वाढवला आहे. त्यांच्या मते मेक अमेरिका ग्रेट अगेन धोरणाचा हा भाग आहे.

3 / 6
 बेसेंट यांनी व्हाईट हाऊसच्या कॅबिनेट बैठकीत जुलै ते ऑगस्ट या काळात कस्टम ड्युटीने होणारी कमाई कित्येक पटीने वाढल्याचे निदर्शनास आणून दिले. तर सप्टेंबरमध्ये ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनावरील खर्चाने होणारी वित्तीय तूट भरून निघण्याची शक्यता आहे.

4 / 6
यंदा रिपब्लिकन सरकारने कर कपात आणि खर्च वाढवण्याचा कायदा आणला. या नवीन कायद्यामुळे केंद्रीय महसूली तूट 3.4 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढण्याची भीती व्यक्त होत होती. पण आता टॅरिफमुळे ही वित्तीय तूट भरून निघण्याची शक्यता आहे

5 / 6
जुलै 2024 मध्ये अमेरिकेने कस्टम ड्युटीतून जवळपास 7 अब्ज डॉलर कमावले. तर जुलै 2025 मध्ये हा आकडा 21 अब्ज डॉलरच्या घरात पोहचला. जून 2025 मध्ये सुद्धा कस्टम ड्युटीचा आकडा जवळपास 20 अब्ज डॉलरपर्यंत पोहचला होता.

6 / 6
तर आता 22 ऑगस्ट 2025 पर्यंत हा आकडा 29.6 अब्ज डॉलरच्या घरात पोहचला आहे. जुलै पेक्षा हा आकडा अधिक आहे. टॅरिफमुळे तो अजून वाढण्याची शक्यता आहे.