Vastu Tips : या 5 वस्तूंमुळे घरात येते गरिबी, आधी फेकून द्या नाहीतर..

दररोज कामावर जाऊन चांगले उत्पन्न मिळवूनही, तुमची आर्थिक परिस्थिती का सुधारत नाही आणि तुमचे पैसे का टिकत नाहीत? तुमचे खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त होत आहेत आणि याचं कारणही समजत नाही. जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

| Updated on: Nov 20, 2025 | 2:37 PM
1 / 6
तुम्ही कधी विचार केला आहे का की, दररोज कामावर जाऊन चांगला पगार मिळवूनही, तुमची आर्थिक परिस्थिती का सुधारत नाही ? हातात  पैसे का टिकत नाहीत?  उत्पन्नापेक्षा जास्त पैसे खर्च होतात आणि त्यामुळे पैशांची तंगी जावणवते. पण याचं कारण काय याचा विचार कधी तुमच्या मनात आला आहे का ?  घरात काही वस्तू ठेवणे घातक ठरू शकते, त्यामुळे गरिबी येऊ शकते. याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतं ते जाणून घेऊया.

2 / 6
तुटलेले घड्याळ: जर तुमच्या घरात  तुटलेले घड्याळ असेल किंवा ते चुकीची वेळ दाखवत असेल तर हे समजून घेतलं पाहिजे की तुमच्या जीवनाच्या प्रगतीत अडथळा येत आहे. म्हणून, घरात नेहमीच योग्य वेळ दाखवणारे आणि बंद पडलेलं नव्हे तर सुरू असलेलं घड्याळ असलं पाहिजे. बंद घड्याळ म्हणजे उर्जेचा अपव्यय, तर तुटलेले घड्याळ म्हणजे तुमचा वेळ चांगला जात नाहीये. म्हणून, तुटलेले घड्याळ लगेच काढून टाका.

3 / 6
काटेरी झाडं: घरातील काटेरी झाडं दिसायला सुंदर वाटतात, पण ती घरात तणाव आणि आर्थिक अडचणी निर्माण करतात. तुमच्या घरात मनी प्लांट, बांबू आणि तुळशीसारखे शुभ रोपे लावा. ही केवळ सुंदरच दिसत नाहीत तर सुख, समृद्धी, शांती आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जातात. घरात कधीही काटेरी झाडे  ठेवू नयेत.

4 / 6
दुःखी चेहऱ्याचा फोटो: लोक अनेकदा भिंतींवर दुःख किंवा तणावाच्या प्रतिमा किंवा फोटो  लावतात. भिंतींवर रडणाऱ्या मुलांचे, युद्धाचे दृश्ये किंवा इतर दुःखी प्रतिमा लावल्याने नकारात्मक ऊर्जा येते. म्हणून, भिंतींवरही विशेष लक्ष द्या आणि देवी लक्ष्मी, हसणारी मुले, नैसर्गिक सौंदर्य किंवा राधा कृष्ण यासारख्या सकारात्मक आणि समृद्ध प्रतिमा किंवा फोटो लावा.

5 / 6
गादीखाली कागदपत्रे ठेवणं: अनेक लोकांना त्यांची कामाचे कागदपत्रे बेडच्या गादीखाली ठेवण्याची सवय असते. बरेच लोक जुन्या, जीर्ण, वापरात नसलेल्या वस्तू आणि अगदी लोखंडी वस्तूही घराभोवती विखुरलेल्या ठेवतात. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. या गोष्टी कधीही बेडवर किंवा गादीखाली ठेवू नयेत.

6 / 6
घरात तुटलेल्या वस्तू : तुमच्या घरात तुटलेली भांडी, आरसे, जुन्या कपड्यांचे ढीग किंवा खराब झालेले फर्निचर आहे का? या गोष्टी केवळ कुरूप दिसत नाहीत तर नकारात्मक उर्जेचे प्रजनन स्थळ देखील असतात. त्यामुळेच अशा वस्तू तुमच्या घरातून लवकरात लवकर काढून टाका. हे अडथळे तणाव आणि आर्थिक नुकसानाचे एक मोठे कारण असू शकतात. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच आमचा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)