Drishyam 3 : ‘दृश्यम 3’ फेम गायतोंडे यांचे तब्बल 70 लाख रुपये पाण्यात, इंडस्ट्रीत पडद्यामागे घडतं खूपकाही…
Drishyam 3 : अभिनेता अजय देवगण स्टारर 'दृश्यम 3' सिनेमाने सध्या चाहत्यांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं आहे. सिनेमाना चर्चेत असातना सिनेमात गायतोंडे या भूमिकेला न्याय देणाऱ्या कमलेश सावंत यांच्याबद्दल मोठी गोंष्ट समोर येत आहे. त्यांचे तब्बल 70 लाख रुपये बुडाले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कमलेश सुतार यांची चर्चा रंगली आहे..

'दृश्यम 3' सिनेमातील अभिनेते कमलेश सावंत यांच्या भूमिकेला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. याआधी देखील कमलेश यांनी अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं असून, त्यांना फसवणुकीचा देखील सामना करावा लागला आहे.
कमलेश सावंत म्हणाले, 'कुणाला त्रास देण्याचा माझा स्वभाव नाही. म्हणून मी कधीच माझे पैसे द्या असा तगादा लावत नाही... आतापर्यंत माझं 70 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. माझे 70 लाख बुडाले नाही तर माझ्यावर घराचं कर्ज नसतं. आता ते पैसे माझे नव्हतेच असं मी समजतो.'
'मी समोरच्याला दोन वेळा फोन करतो, त्यानंतर तिसऱ्यांदा सांगतो, 'मेरे पैसे दो वरना जाने दो...' मग शेवटी पैसे कोणी देत नाही. आज त्यातले काही निर्माते नाहीत.. पैसे मागायला मला आवडत नाही. पण मी माझं काम चोख करतो... '
कमलेश असं देखील म्हणाले की, 'माझ्या स्वभावामुळे मला काम मिळतं, माझे कुठलेही टॅन्ट्रम नाहीत. हा माझा मोठेपणा नाही तर, स्वभाव आहे... कदाचित असा स्वभाव माझ्या वडिलांकडून आला असावा...' अंसं देखील कमलेश सावंत म्हणाले.
कमलेश सावतं यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी रिंगा रिंगा, लालबाग परळ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दगडी चाळ, एक क्रांतिवीर: वासुदेव बळवंत फडके, फास यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता ते 'दृश्यम 3' सिनेमामुळे चर्चेत आहेत.