Drishyam 3: पोलीस इतके बुद्धू.., ‘दृश्यम’मधील विजय साळगावकरच्या कारनाम्यावर अनुच्या वडिलांचं मोठं वक्तव्य, खऱ्या आयुष्यात आहेत पोलीस

‘दृश्यम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी छोटी अनु म्हणजेच मृणाल जाधव पुन्हा चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने वडिलांबद्दल एक खास खुलासा केला असून, चित्रपटाबाबत त्यांच्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर...

| Updated on: Oct 27, 2026 | 10:29 AM
1 / 6
'दृश्यम' या चित्रपटातील छोटी अनु हे पात्र प्रेक्षकांच्या आजही चांगलंच लक्षात आहे. मराठी अभिनेत्री मृणाल जाधव हिने या भूमिकेतून प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली होती. आता तिच्या एका मुलाखतीमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

'दृश्यम' या चित्रपटातील छोटी अनु हे पात्र प्रेक्षकांच्या आजही चांगलंच लक्षात आहे. मराठी अभिनेत्री मृणाल जाधव हिने या भूमिकेतून प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली होती. आता तिच्या एका मुलाखतीमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

2 / 6

अभिनेत्री मृणाल जाधव हिचे वडील रवींद्र जाधव हे मुंबई पोलीस दलात अधिकारी आहेत. अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीला ते नेहमीच प्रोत्साहन देतात. मात्र, पोलीस अधिकारी असल्यामुळे मुलीच्या सुरक्षिततेबाबत ते अधिक सतर्क असतात, असं मृणालने मुलाखतीत सांगितलं.

3 / 6

मृणालने सांगितलं की, तिच्या वडिलांना 'दृश्यम' हा चित्रपट आवडला होता. मात्र, सिनेमात पोलिसांना ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं, त्यावर त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. 'पोलीस इतके बुद्धू नसतात,' असं ते म्हणाले होते. चित्रपटांमध्ये कथेसाठी काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने दाखवल्या जातात, याचीही त्यांना जाणीव असल्याचं मृणालने स्पष्ट केलं.

4 / 6

पोलीस दलात काम करत असल्यामुळे समाजात घडणाऱ्या घटना आणि विविध गुन्ह्यांची माहिती मृणालच्या वडिलांना असते. त्यामुळे मुलीने मनोरंजन क्षेत्रात काम करताना स्वतःची काळजी घ्यावी, अशी त्यांची इच्छा असते. या सतर्कतेचा फायदा होत असला, तरी कधी कधी त्यामुळे काही मर्यादाही जाणवतात, असं मृणालने प्रामाणिकपणे सांगितलं.

5 / 6

मृणाल जाधव अभिनय क्षेत्रात काम करते, याचा तिच्या वडिलांना आनंद आहे. तिला आवडणाऱ्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी ते नेहमीच पाठिंबा देतात. मात्र, मनोरंजन क्षेत्रातील झगमगाटामागे काही धोकेही असू शकतात, याची जाणीव ठेवून स्वतःचं संरक्षण करावं, असा सल्ला ते तिला देतात.

6 / 6

मृणालने सांगितलं की, तिचे वडील ड्युटीमध्ये व्यस्त असल्यामुळे तिच्या शूटिंगला किंवा चित्रपटांच्या प्रीमियरला सहसा उपस्थित राहू शकत नाहीत. ती अनेकदा त्यांना आवर्जून येण्याची विनंती करते. प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसलं, तरी तिच्या करिअरला असलेला त्यांचा पाठिंबा आणि तिने स्वतःची काळजी घ्यावी, ही त्यांची इच्छा तिच्यासाठी महत्त्वाची आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us