
अनेक बाॅलिवूड अभिनेत्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट निर्मात्यांना देशोधडीला लावले आहे. कोट्यावधी रूपये फिस घेऊनही त्यांचे चित्रपट फ्लाॅप गेले. यामध्ये अनेक फेमस अभिनेत्यांचा समावेश आहे.

बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंह याचे गेल्या काही दिवसांपासून सतत चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. सर्कस, 83, जयेशभाई जोरदार असे चित्रपट फ्लाॅप गेले आहेत. यामुळे निर्मात्यांना मोठे नुकसान हे सहन करावे लागले.

अभिनेते सनी देओल हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, सनी देओल यांचे तब्बल 13 चित्रपट एका मागून एक फ्लाॅप गेले. यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठे नुकसान हे सहन करावे लागले.

अक्षय कुमार याचे देखील चित्रपट सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट फ्लाॅप गेलाय. पाच चित्रपट एका मागून एक अक्षय कुमार याचे फ्लाॅप गेले आहेत.

सैफ अली खान याचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला विक्रम वेधा हा चित्रपट फ्लाॅप गेला. यामुळे निर्मात्यांना मोठे नुकसान हे सहन करावे लागले होते. सैफ अली खान हा नेहमीच चर्चेत असतो.