
अभिनेत्री सारा लहानपणापासून सिनेमांमध्ये काम करत आहे. तिने तमिळ, तेलुगू आणि हिंदीसारख्या भाषांमध्ये बालकलाकार म्हणून काम करणे सुरू ठेवले. तमिळ प्रेक्षकांकडून तिला सर्वाधिक सकारात्मक प्रतिसाद मिळालेला सिनेमा 'सैवम' होता.

त्यानंतर सारा हिने मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन' या सिनेमात तरुण नंदिनीची भूमिका साकारली. सध्या सारा 'धुरंधर' सिनेमामुळे चर्चेत आहे. यामध्ये तिने तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या असलेला अभिनेता रणवीर सिंग सोबत काम केलं आहे.

'धुरंधर 2' सिनेमात अभिनेत्री रणवीर सिंग यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. सिनेमामुळे सारा हिच्या लोकप्रिय मोठी वाढ झाली आहे. तर सिनेमासाठी अभिनेत्रीने मानधन देखील मोठं घेतलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा हिची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सारा अर्जुनला 'धुरंधर' आणि 'धुरंधर द रिव्हेंज' या दोन सिनेमांमधील तिच्या भूमिकांसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये मानधन मिळाले आहे.

पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणून 1 कोटी रुपये मानधन मिळणं ही तिच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमाच्या यशानंतर तिचे अनेक मोठे सिनेमे येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीने अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.