
भारतीय शेअर बाजारात मोठा भूकंप आला आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतावर 500 टक्क्यांचा टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याचा धसका बाजाराने घेतला आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी विक्री सत्र अवलंबले आहे. पण अशा परिस्थितीतही या पेनी स्टॉकने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. कोणता आहे हा पेनी शेअर?

Ujjivan Small Finance Bank चा पेनी शेअर जोमात आहे. या गुरुवारी या शेअरमध्ये जवळपास 3 टक्क्यांची तेजी आली आहे. या शेअरचा भाव 60 रुपयांपर्यंत पोहचला. हा शेअर गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकावर पोहचला. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हा शेअर 30.85 रुपयांच्या निच्चांकावर पोहचला होता.

या बँकेकडे 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत एकूण 42,219 कोटींची ठेव असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. या बँकेच्या निधीत वार्षिक आधारावर 22.2 टक्क्यांची वाढ दिसून आली. गेल्या तिमाहिती या बँकेची ठेव 7.5 टक्क्यांनी वाढली. तर सरत्या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात बँकेचे क्रेडिट डिपॉझिट रेश्यो 87.8 टक्के इतका होता.

या बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. होमलोनची प्रकरण अधिक असून उद्योगासाठी आणि व्यापारीसाठी अनेकांनी या बँकेकडून कर्ज घेतल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. त्यामुळे बँकेची उलाढाल चांगली असल्याचे दिसून येते.

चालू आर्थिक वर्षात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेला दुसऱ्या तिमाहिती 122 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. तिमाही आधारीत 18.2 टक्क्यांची वृद्धी दिसून आली आहे. त्यामुळे बँकेच्या शेअरमध्ये उसळी दिसून येत आहे. हा शेअर त्याच्या उच्चांकावर पोहचला असल्याचे दिसते.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.