Diwali 2026 : दिवाळीत काढा सोपी आणि सुंदर रांगोळी, या 5 डिझाईन ठरतील बेस्ट
Diwali 2026 : जर तुम्ही यावर्षी सुंदर रांगोळी काढण्याचा विचार करत असाल तर या सोप्या टिप्सचे करून तुम्ही अतिशय सुंदर रांगोळी बनवू शकता. आता संपूर्ण भारत दिवाळीच्या तयारीत व्यस्त आहे. दिवाळीत सर्वत्र रोषणाई तर केलीच जाते पण आकर्षक रांगोळ्यांनी दाराची शोभा वाढते. तर तुम्ही देखील सोप्या रांगोळ्या दारात काढा आणि दाराचं सौंदर्य वाढवा...

दारासमोर रांगोळी काढल्यामुळे मन देखील प्रसन्न राहतं. रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते
तेजाचे प्रतिक असणारे दिवे वापरल्यामुळे तुमची रांगोळी अजुनच सुंदर होण्यास मदत होईल. तुमची रंगोळी आकर्षित करण्यासाठी तुम्ही दिव्यांचा वापर करु शकता.
दिव्यामुळे सर्वत्र सकारात्मता निर्माण होते. सर्व वातावरण अगदी प्रसन्न होते. दिवा हा तुमची रांगोळी सजवण्यासाठी कोणता चांगला मार्ग असू शकतो. तुम्ही दिवे आणि मेणबत्त्यांनी रांगोळी सजवू शकता.
अनेकांना रांगोळी काढायला प्रचंड आवडतं पण चांगली जमत नाही. अशात इंटरनेटवर रांगोळ्या शोधल्या जातात. त्यामुळे काही साध्या रांगोळ्या तुम्ही दारात काढू शकता.
फक्त रांगोळी सुंदर आणि देखीव असावी असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून सोप्या रांगोळ्या योग्य ठरतात. रांगोळ्यांमधील रंगांमुळे देखील सकारात्मक वातावरण तयार होतं.