काही मिनिटांत बेसनाचे लाडू बनवण्याचा ‘हा’ एक सोपा मार्ग

काही दिवसांवर आता दिवाळी आली आहे. म्हणून प्रत्येकाच्या घरी फराळाची गडबड असेल. चकली, करंजी असे अनेक पदार्थ दिवाळीसाठी घरी बनवले जातात. फराळामध्ये सर्वांना बेसणाचे लाडू सर्वांना आवडतात. तर, घरी बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी काही टीप्स माहिती करुन घ्या...

| Updated on: Oct 12, 2025 | 3:31 PM
1 / 5
लाडूसाठी थोडं जाडसर बेसन वापरल्यास चव आणि लाडू देखील चांगले वळवता येतात. सर्वात आधी बेसन खरपूस भाजून घ्या. मध्यम आचेवर सातत्याने ढवळत बेसन खरपूस भाजा. त्याचा खमंग आला कीच गॅस बंद करा.

2 / 5
एक गोष्ट लक्षात ठेवा बेसन ओव्हरकूक करू नका... लाडू चविष्ट आणि मऊसर होण्यासाठी तूप भरपूर लागते. बेसन पूर्ण तुपात भिजल्यास लाडू नीट वळतात.

3 / 5
बेसन भाजून त्याला थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यात साखर मिसळण्याआधी ते पूर्ण थंड होऊ द्या, अन्यथा साखर वितळून लाडू चिकट होतील.

4 / 5
साखर बारीक पूड करून वापरा.... साधी साखर वाटून बारीक पावडर करून घ्या. यामुळे लाडूंमध्ये गुठळ्या राहत नाहीत.

5 / 5
वेलदोड्याची पूड आणि खवलेले बदाम-काजू घातल्याने लाडूला स्वादिष्ट सुगंध व चव येते. मिश्रण थंड झाल्यावर हाताने घट्ट वळून लाडू तयार करा. खूप सैल मिश्रण असल्यास थोडं दूध टाकू शकता, पण कोरडेच लाडू चांगले.